Pune Drugs Party: पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणात पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये! 8 जणांना घेतलं ताब्यात, तपास सुरू

Pune Drugs Party: फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील 'एल ३-लिक्विड लीजर लाउंज' पब बारमध्ये रविवारी (ता. २३) पहाटेपर्यंत चाललेल्या पार्टीत धांगडधिंगा सुरू होता. तसेच या पबमध्ये काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Pune Drugs Party
Pune Drugs PartyEsakal
Updated on

फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील 'एल ३-लिक्विड लीजर लाउंज' पब बारमध्ये रविवारी (ता. २३) पहाटेपर्यंत चाललेल्या पार्टीत धांगडधिंगा सुरू होता. तसेच या पबमध्ये काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याचा व्हिडिओ सकाळी व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासन जागे झाले. याप्रकरणी पोलिसांनी पबचालकासह पाच जणांना अटक केली आहे. संबंधित पब, बार सील केला असून, याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण ८ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या ८ जणांविरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. बार मालकासह, डीजे, मॅनेजरसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ कलम लालण्यात आले आहेत.

पबचालक रवी माहेश्वरी, उत्कर्ष देशमाने, योगेंद्र गिरासे, व्यवस्थापक मानस मलिक आणि पार्टी आयोजक अक्षय कामठे अशी अटक केलेल्या काही संशयितांची नावे आहेत.

Pune Drugs Party
Pune Drugs Party: हॉटेलच्या वॉशरूममध्ये ड्रग्ज पार्टी, पुण्यात दोन जणांना अटक

कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलिस, उत्पादन शुल्क विभाग आणि महापालिकेकडून कल्याणीनगरसह शहरातील विविध भागांतील पबवर कारवाई केली जात आहे. असे असतानाही फर्ग्युसन रस्त्यावरील तुकाराम पादुका चौकाजवळ 'एल ३- लिक्विड लीजर लाउंज' हा पब रविवारी पहाटे पाचपर्यंत सुरू होता. तेथे तरुण- तरुणी मद्यपान करत होते. या पबमधील पार्टीच्यावेळी काही तरुण स्वच्छतागृहात अमली पदार्थांचे सेवन करात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

Pune Drugs Party
Pune Drug Case: मालक एक चालवणारे दुसरेच... पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणात पोलिसांचा मोठा खुलासा! आतापर्यंत काय कारवाई केली?

महाविद्यालयापासून काही अंतरावरच हा प्रकार घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. या प्रकरणाची गांभीयनि दखल घेत पोलिस आयुक्त त अमितेश कुमार यांनी कारवाईचे आदेश दिले होते. पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी या प्रकरणाची चौकशी केली.

त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. आणखी काही जणांना ताब्यात घेतले जात आहे. याप्रकरणी पब, बार व्यावसायिकांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेला पदार्थ अमली पदार्थ आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. या गंभीर घटनेनंतर रात्री गस्तीवर असलेल्या दोन बीट मार्शलचे निलंबन केले आहे.

Pune Drugs Party
Pune Drugs Case: पुण्यात ड्रग्ज पार्टी झालेले एफसी रोडवरील हॉटेल कोणते? दोन जण ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.