Pune News : महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुणे शहरात नाकाबंदीसह रात्रीची पोलिस गस्त वाढवली

महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष सुरक्षा अभियान सुरू, महिला पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक तैनात
police
policeesakal
Updated on

पुणे : आयटी कंपन्यांसह रात्री घरी परतणाऱ्या नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील आयटी कंपन्यांचा परिसर, बसस्थानक आणि प्रमुख चौकांमध्ये शुक्रवार (ता. २३) पासून विशेष सुरक्षा अभियान सुरू करण्यात आले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी शहरात विशेष सुरक्षा अभियान राबविण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुरुवारी दिले होते.

एका रिक्षाचालकाने वानवडी परिसरात मंगळवारी (ता. २०) पहाटे एका संगणक अभियंता तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेची पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गांभीर्याने दखल घेत तातडीने विशेष अभियान राबविण्याचे आदेश दिले होते.

त्यांनी गुन्हे शाखा, वाहतूक शाखेसह शहरातील सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शहरात नाकाबंदी आणि रात्रीची पोलिस गस्त वाढविण्यात आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.

police
Pune Crime : महिलेचे शोषण आणि सैन्यात भरतीचे आमिष; तोतया लष्करी अधिकाऱ्याला अटक

स्वारगेट आणि शिवाजीनगर बसस्थानकातून कॅब आणि रिक्षाने घरी जाणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी स्वारगेट, शिवाजीनगर बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावर महिला पोलिस कर्मचाऱ्यांचे विशेष पथक नेमण्यात आले आहे. हे पोलिस पथक रात्रभर तैनात असेल, अशी माहिती परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.

police
Pune News : खचलेल्या चेंबरमुळे अपघात; भाजपचे प्रशानसाविरोधात आंदोलन

शहरात नाकाबंदी आणि पोलिस गस्त वाढविण्यात आली आहे. कॅब आणि रिक्षाचालकांचा परवाना आणि कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. कॅब, रिक्षाचा क्रमांक आणि चालकाचे नाव लिहून घेतले जात आहे. तसेच, मद्यपी वाहनचालक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

- प्रवीणकुमार पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त

  • महिलांसाठी हेल्पलाइन क्रमांक १०९१

  • पोलिस नियंत्रण कक्ष क्रमांक- १००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.