..लेकिन गलत को सही करनेसे फर्क पडता है; बदली होताच पोलीस अधिकाऱ्याचे स्टेटस्

Pune Police
Pune Police
Updated on

पुणे - पुणे पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांची नुकतीच बदली करण्यात आली. मात्र पुराणिक यांचा काही लोकांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या प्रकरणात एका महिलेने महिला आयोगामध्ये तक्रार दिली होती. त्यानंतर पुराणिक यांची बदल करण्यात आली. त्यानंतर त्यांनी व्हॉट्स ॲपला ठेवलेलं स्टेटस् चर्चेत आलं आहे.

Pune Police
बारामतीकर डॉ. धनंजय घनवट यांना मुख्यमंत्री विशेष सेवा पदक

राजेश पुराणिक यांची आज बदली करण्यात आली होती. पुराणिक हे सामाजिक सुरक्षा विभागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहत होते. मात्र आज त्यांना हटवून नवीन अधिकाऱ्याला ही जबाबदारी देण्यात आली

पुराणिक यांचा काही लोकांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या प्रकरणात एका महिलेने महिला आयोगामध्ये तक्रार दिली होती. याप्रकरणी योग्य तो तपास करण्याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना निर्देश देण्यात आले होते.

Pune Police
शिंदे गटाला कमी निधी मिळालाय; भाजपवर राष्ट्रवादीचा पलटवार

आज बदली झाल्यानंतर, त्यांनी व्हॉट्स ॲपला स्टेटस् ठेवलं होतं. "सर यहा कुछ ऑफिसर्स हे जो इमानदारी से अपनी ड्युटी करना चाहते है, लेकिन हमराही डिपार्टमेंट हमारी कोसने पर लगा हुवा है" "गलत क्या है ये जानने से कोई फरक नही पडता, लेकिन गलत को सही करनेसे फर्क पडता है", असं स्टेट्स त्यांनी ठेवलं. तसेच त्यांनी अभिनेता अजय देवगन यांचा सुप्रसिद्ध चित्रपट सिंघम मधील एका दृश्याची लिंक देखील त्यांच्या व्हाट्सअप स्टेटस वर ठेवली आहे. त्यामुळे पोलिस दलात त्यांच्या व्हॉट्स ॲप स्टेट्सची चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.