वडगाव शेरी - बदलापूर येथे घडलेल्या बाल लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर पोलीस खाते ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलीस ठाणे हद्दीतील बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी जनजागृती, तसेच ‘गुड टच बॅड टच’ कार्यशाळा घेत पोलीस शालेय विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत असून तसेच शालेय परिसरातील सुरक्षिततेबाबत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेत आहेत.