पुणे - राज्यातील (Maharashtra) एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी तसेच परराज्यात प्रवास (Journey) करण्यासाठी नागरिकांना (Citizens) पोलिसांकडून (Police) ‘ई-पास’ (E-Pass) घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आत्तापर्यंत एक लाख ११ हजार २४३ जणांनी पोलिसांकडे ऑनलाइन अर्ज (Online Form) केले, त्यापैकी २८ हजार ६६९ जणांनाच ई-पास उपलब्ध (Available) झाले. बहुतांश नागरिकांचे अर्ज भरताना होणाऱ्या त्रुटींमुळे त्यांचे अर्ज पोलिसांकडून नामंजूर होत असल्याची सद्यःस्थिती आहे. दरम्यान, अर्ज बाद झालेल्यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांच्या ट्ठिटरवर संपर्क साधल्यास नागरीकांना दिलासा मिळू शकणार आहे. 9Police Online Form E Pass Available)
पुणे पोलिसांकडून मागील महिन्यापासून नागरीकांना इतर जिल्ह्यात, परराज्यात प्रवास करण्यासाठी covid१९@mhpolice.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. नागरिकांकडून जवळच्या नातेवाइकाचा मृत्यू, अंत्यविधी, वैद्यकीय कारण तसेच विवाह समारंभासाठी वधू-वर त्यांचे आई-वडील व कुटुंबातील अन्य सदस्यांना ई-पास देण्यात येतो. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. तसेच असे असूनही ई-पाससाठी अर्ज करताना नागरिकांकडून अनेक त्रुटी ठेवल्या जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचे अर्ज बाद होत आहेत.
अशा आहेत त्रुटी
ऑनलाइन अर्ज भरताना नागरिक संबंधित अर्जासोबत स्वतःचे ओळखपत्र जोडत नाहीत
स्वतःचे वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच करोना चाचणीचे प्रमाणपत्र जोडत नाहीत
प्रवास कशासाठी करायचा आहे, याचीही कागदपत्रे जोडली जात नाहीत
अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात जोडली जात नाहीत
विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून विमान तिकीट जोडण्याकडेही दुर्लक्ष केले जाते
अनेक कागदपत्रांवर अस्पष्ट छायाचित्र, प्रवासाचे अर्धवट किंवा चुकीचे कारण, अपूर्ण पत्ता असतो
वेगवेगळ्या कारणांमुळे नागरिकांचे ई-पाससाठीचे अर्ज बाद होत आहेत. त्यामुळेच अशा नागरीकांनी माझ्या ट्विटरवर संपर्क साधल्यास, त्यांच्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी करून त्यांना ई-पास मिळण्यासाठी सहकार्य करण्याची सोय आम्ही उपलब्ध करून दिली आहे.
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त
...तर येथे साधा संपर्क
काही नागरिकांचे ई-पाससाठीचे अर्ज प्रलंबित आहेत किंवा नाकारले आहेत. त्यांना काही शंका असल्यास त्यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या @cppunecity वर संपर्क साधावा. काही शंका असल्यास ट्विटखाली ई-पाससाठी अर्ज केल्याचा टोकन क्रमांक टाकावा. त्यानंतर पोलिसांकडून ई-पाससाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पुर्नपडताळणी करण्यात येईल. त्यानंतर नागरीकांना पास उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.