मनसेच्या सभेला पोलिसांची परवानगी; पाळाव्या लागणार अटी

सभेसाठी २१ अटी पोलिसांनी घातल्या आहेत. या अटींचं उल्लंघन झाल्यास कारवाई होणार
Raj Thackeray in Pune | Pune MNS News
Raj Thackeray in Pune | Pune MNS NewsSakal
Updated on

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या पुण्यातील स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच या बंदिस्त सभागृहात सभा पार पडणार आहे. या सभेची तयारी मनसेकडून सुरु असतील तरी त्यांना काही वेळापूर्वी पोलिसांनी परवानगी दिली. पण या सभेसाठी २१ अटी पोलिसांनी घातल्या आहेत. (Police permission granted for MNS rally in Pune Conditions must be complied with)

Raj Thackeray in Pune | Pune MNS News
औरंगाबादेतील विद्यार्थिनीच्या खूनप्रकरणी चित्रा वाघ संतापल्या; म्हणाल्या, शिवशाहीच्या नावानं...

पुण्यातील मनसेचे पदाधिकारी बाबू आगस्कर म्हणाले, पोलिसांनी आम्हाला परवानगी दिली आहे. पण परवानगी देताना पोलिसांनी ज्या अटी टाकल्या आहेत. या अटींवर आमचा आक्षेप घेतला आहे. यामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशनच्या वरीष्ठ पोलीस निरिक्षकांनी राज ठाकरेंच्या सभेसाठी १३ अटी टाकल्या आहेत. तसेच पोलीस उपायुक्त विशेष शाखा पुणे शहर म्हणजेच पोलीस आयुक्त कार्यालयानं ८ अटी टाकल्या आहेत. या मिळून २१ अटी पोलिसांनी टाकल्या आहेत.

या अटींचं आम्ही स्वागत करतो, या अटी-शर्तीचं पालन आम्ही करणारच आहोत. आम्हाला जे सांगायचं आहे आम्हाला जे बोलायचं आहे ते आम्ही करणारच आहोत. आम्ही दोन समाजात तेढ निर्माण करणाचा नाहीतर जे सत्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.

Raj Thackeray in Pune | Pune MNS News
शरद पवार-ब्राह्मण समाजाची बैठक संपली; काय झाली नेमकी चर्चा? जाणून घ्या

राज ठाकरेंचा अयोध्येचा दौरा रद्द झालेला नाही, त्याला स्थगिती देण्यात आली आहे. राज ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर शंभर टक्के जाणार आहेत. मीडियाला त्या ठिकाणी आम्ही घेऊन जाणार आहोत. अयोध्येतील विषय असेल, मुख्यमंत्र्यांची झालेली सभा असेल तसेच महाराष्ट्रातील इतर प्रश्न यांवर पुण्यातील सभेत मुद्दे असतील असंही यावेळी आगस्कर यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.