Police Bharti : पोलिस भरती प्रक्रियेस प्रारंभ;पारदर्शकतेसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब

पुणे शहर पोलिस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलिस, पुणे लोहमार्ग पोलिस आणि कारागृह येथील पोलिस शिपाई भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
Police Bharti
Police Bhartisakal
Updated on

पुणे : पुणे शहर पोलिस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलिस, पुणे लोहमार्ग पोलिस आणि कारागृह येथील पोलिस शिपाई भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत शिपाई चालक संवर्गातील २०३, ग्रामीण पोलिस दलात पोलिस शिपाई पदासाठी ५१३, कारागृह विभागात कारागृह शिपाई पदासाठी ५१३ आणि लोहमार्ग पोलिसांत ६८ अशा जागांसाठी भरतीप्रक्रिया होणार आहे.

यासाठी उमेदवारांनी अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या छायांकित व साक्षांकीत प्रतींचे दोन संच व पाच छायाचित्रे सोबत ठेवावीत. ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जात आहे. यामुळे भरतीसाठी कोणाच्याही प्रलोभनाला बळी पडू नये. भरती करून देण्याचे आमिष कोणी दाखवत असेल तर दक्षता अधिकारी हिम्मत जाधव (उपायुक्त विशेष शाखा) यांच्या ८९७५२८३१०० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ही प्रक्रिया १२ जुलैपर्यंत चालणार आहे. २८ जून ते ३० जुलै दरम्यान पुणे शहरात पालखी बंदोबस्त असल्याने त्या दिवशी भरतीप्रक्रिया होणार नाही, अशी माहिती अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया यांनी सोमवारी (ता. १७) पत्रकार परिषदेत दिली. या वेळी उपायुक्त रोहिदास पवार उपस्थित होते.

आयुक्तालयातील भरती उद्यापासून

पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गतील भरती प्रक्रिया १९ जूनपासून शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात होईल. यासाठी यंदा जानेवारीत अर्ज भरून घेण्यात आले होते, मात्र निवडणूक आचारसंहिता व इतर कारणांमुळे प्रक्रिया सुरु झाली नव्हती. शिपाई चालक संवर्गातील २०२ जागांसाठी २० हजार ३८२ अर्ज आले आहेत. यामधील ईएसईबीसी संवर्गांतर्गत नव्याने लागू झालेले मराठा आरक्षण दहा टक्के आहे.

‘आरएफआयडी’ तंत्रज्ञानाचा वापर

पुणे ग्रामीण पोलिस दलातील पोलिस शिपायांची ४४८ व चालक पोलिस शिपायांची ४८ रिक्त पदे भरली जातील. पोलिस शिपाई चालक पदासाठी मैदानी चाचणी परिक्षा १९ जून ते २८ जून दरम्यान होईल. पोलिस शिपाई चालक पदासाठी पाच हजर ३१४, तर पोलिस शिपाई पदासाठी ४२ हजार ४०३ अर्ज आले आहेत. पोलिस शिपाई भरतीप्रक्रियेत मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी ‘आरएफआयडी’ (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) या तंत्रज्ञानाचा वापर होईल. त्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी परिक्षा पारदर्शक व अचूक निर्णय होण्यासाठी मदत होईल, अशी माहिती पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

पोलिस भरतीमध्ये उमेदवारांना विविध पदांकरिता (पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, सशस्त्र पोलिस शिपाई, बैंडसमन, तुरुंग विभाग शिपाई) एका घटकांत किंवा वेगवेगळ्या घटकांत अर्ज करता येतात. त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा पाठोपाठच्या दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन अपर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) यांनी सूचना दिल्या आहेत. पावसामुळे मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर उमेदवारांना पुढील सुयोग्य तारीख दिली जाईल. काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरिता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याची सूचना मिळाली असेल अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल, मात्र त्यासाठी पहिल्या मैदानी चाचणीस हजर राहिल्याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणीच्या वेळी सादर करावे लागतील.

लोहमार्ग पोलिस शिपाई पदासाठी ६८ जागा रिक्त आहेत. त्यासाठी तीन हजार १८२ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या पदाची भरती प्रक्रीया १९ जूनपासून सुरू होणार आहे. भरतीतील गैरप्रकार टाळण्यासाठी लोहमार्ग पोलिस भरती दरम्यान तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, असे पुणे लोहमार्ग पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पाच तृतीयपंथींचे अर्ज

कारागृह पश्चिम विभागासाठी कारागृह पोलिस शिपाई पदासाठी ५१३ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी एक लाख १० हजार ४८८ अर्ज आले आहेत. ही भरती प्रक्रिया पुणे पोलिस आयुक्तालयामार्फत घेतली जाणार आहे. या पदांसाठी पाच तृतीयपंथींचे अर्ज आले आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांची शारीरीक चाचणी घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पुणे पोलिसांची शिपाई चालक संवर्गातील भरती प्रक्रिया झाल्यानंतर राबविण्यात येणार आहे.

गैरप्रकार टाळण्यासाठी घ्या ही काळजी...

  • मैदानी चाचणी दरम्यान प्रत्येक टप्प्यावर बायोमेट्रिक तपासणी

  • बक्कल नंबर मिळालेल्या उमेदवाराला पुढे मैदानी चाचणीसाठी प्रवेश दिला जाणार

  • सर्व प्रक्रियेचे सुरुवातीपासूनच प्रत्येक टप्प्यावर व्हिडिओ

  • चित्रीकरण होणार

  • भरतीत मूळ उमदेवाराऐवजी डमी उमेदवार येण्याचे मागील गैरप्रकार पाहता निवड प्रत्येक टप्प्यांतील उमेदवारांचे व्हिडिओ पाहता येणार

  • उमेदवारांना अडचण किंवा शंका असल्यास त्यांनी पुढील ई-मेलवर संपर्क साधता येईल raunak.saraf@mahait.org

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.