Pune News : पोलिस घेताय पार्टीसाठी अमली पदार्थ पुरविणाऱ्याचा शोध; एल थ्रीमधील पार्टी प्रकरण

आरोपींकडे अंगझडतीदरम्यान कोकेन व मेफेड्रोन हे अमली पदार्थ आढळून आले आहेत.
पोलिस
पोलिस sakal
Updated on

पुणे ः नामदार गोपाळकृष्ण गोखले पथावर (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) असलेल्या लिक्विड लीजर लाउंज (एल थ्री) बारमध्ये झालेल्या पार्टीत ड्रग पुरवठा केल्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या ओंकार सकट याने कासेवाडीमधील एकाकडून अमली पदार्थ घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्या व्यक्तीकडून सकटने अमली पदार्थ घेतले होते. त्यानंतर ते अभिषेक सोनावणेमार्फत करण मिश्रापर्यंत पोचले होते, अशी माहिती सहायक सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी मंगळवारी (ता. २) न्यायालयाला दिली.

पोलिस
Crime News : जुन्या नोकरानेच टाकला दरोडा , अकोला पोलिसांनी साथीदारासह ठोकल्या बेड्या

सोनावणे याने एल थ्री बारमध्ये झालेल्या पार्टीवेळी कोणाकोणाला अमली पदार्थ दिले होते याबाबत इतर आरोपींच्या समक्ष विचारपूस करायची आहे. आरोपींकडे अंगझडतीदरम्यान कोकेन व मेफेड्रोन हे अमली पदार्थ आढळून आले आहेत. त्याअनुषंगाने त्यांचा वावर असलेल्या अन्य ठिकाणांची माहिती घेऊन त्या ठिकाणांची झडती घ्यायची आहे. त्यांच्या मोबाईलच्या विश्लेषणावरून अन्य आरोपींचा तपास करायचा आहे. एल थ्री बारमधील पार्टी व्यतिरिक्त त्यांनी शहरातील अन्य कोणत्या हॉटेलमध्ये अमली पदार्थ पुरविले आहे का? याचा शोध घ्यायचा आहे. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार कोण आहे तसेच त्यांचे अन्य कोणी साथीदार त्यांना ड्रग पुरविण्यास मदत करतात याबाबतचा तपास करायचा असल्याने त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकार पक्षासह तपास अधिकारी चंद्रशेखर सावंत यांनी न्यायालयाला केली. एल थ्री बारमधील पार्टीत वापरल्याचे मेफोड्रॉन वापर केल्याचे आरोपी अभिषेक सोनावणे याने सांगितले आहे. आरोपी नितीन ठोंबरे आणि मिश्रा याने अभिषेक सोनावणेकडून अमली पदार्थ घेतले असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिस
Nashik Abduction News : युवतीचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न! देवळाली कॅम्पातील घटना

पोलिस कोठडीत सहा जुलैपर्यंत वाढ ः

या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या अभिषेक अमोल सोनवणे (वय २३, रा. डिझेल कॉलनी, रेल्वे क्वार्टर), ओंकार अशोक सकट (वय २८, रा. महात्मा फुले पेठ) आणि इडोको स्टॅव्हली संडे (रा. नायजेरिया) यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्यांना मंगळवारी (ता. २) अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्यांच्या पोलिस कोठडीत सहा जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

आरोपींचे तपासास असहकार्य

एल थ्री बारमधील पार्टीत पुरविण्यात आलेले ड्रग कोठून आणले याबाबत आरोपींकडे तपास करण्यात येत आहे. मात्र, ते तपासास सहकार्य करीत नसल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. याखेरीज, इडोको हा परकीय नागरिक आहे. त्याच्याकडे पारपत्र तसेच त्याच्या ठावठिकाण्याबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्यामुळे, आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्याचा सखोल तपास करायचा असल्याने सांगत पोलिसांनी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.