पुणे - राज्यातील कोपरखैरणे, उरण, बदलापूर आणि पुण्यातील बोपदेव घाट परिसरात लैंगिक अत्याचार प्रकरणातील सर्व आरोपी परराज्यांतील आहेत. अशा घटनांमुळे पुण्यासह महाराष्ट्राची बदनामी होत आहे. त्यामुळे पोलिसांनी परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची चारित्र्य पडताळणी करावी. तसेच, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली.