पुणे : स्पर्धा परिक्षेची तयारी (MPSC Student) करणाऱ्या अमर रामचंद्र मोहिते (वय 33) या तरूणाने आज राहत्या घरी आत्महत्या (MPSC Student Suicide In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या विद्यार्थ्याच्या भावाकडे चौकशी केली असता, कौटुंबिक अडचणींमुळे आलेल्या (Family Issue) नैराश्यातून अमरने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Police Statement After Amar Mohite Suicide)
अमर मोहिते हा पुण्यातील सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) राहत होता. मागील 2 वर्षापासून तो PSI ची तयारी करत होता. दरम्यान, शारीरिक क्षमता (PSI Physical Test) चाचणीत केवळ (MPSC Exam) एक गुण कमी पडल्याने त्याची संधी गेली होती, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे. दरम्यान, अमरने आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईड (Suicide Note) नोट मागे सोडलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) टिकलं असतं तर, अमरच्या हातातून संधी गेली नसती अशी देखील चर्चा आता सुरू झाली आहे.
अमर मोहितेचा भाऊ भोसरी (Bhosari Police Station) पोलीस ठाण्यात पीएसआय आहे. त्याने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अमरच्या खोलीचे दार उघडले आणि हा प्रकार समोर आला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. विषारी औषध (Poison) प्राशन करून अमरने आत्महत्या (Suicide) केल्याचे पोलीस म्हणाले. ही घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली असून अमर हा मूळचा सांगली (Sagali) येथील असून त्याचा भाऊ पिंपरी चिंचवड पोलीस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.