Daund News: मला न विचारता किराणा सामान का भरले? म्हणून पोलिसाची पत्नीला बेदम मारहाण

दौंड पोलिस ठाण्याचे (Daund Police Station) अंमलदार बापू रोटे यांनी याबाबत माहिती दिली.
Daund Police Station Case
Daund Police Station Caseesakal
Updated on
Summary

पत्नी प्रियांका शिंदे यांनी घरासाठी किराणा सामान आणले असता, सोमनाथ शिंदे यांनी `मला न विचारता किराणा सामान का भरले?` असा प्रश्न करीत मारहाण केली.

दौंड : पुणे जिल्ह्यात किरकोळ कौटुंबिक वादातून पत्नीला पट्ट्याने बेदम मारहाण केल्याप्रकरणी दौंड शहरात पोलिस नाईक पदावर (Police Naik Post) कार्यरत असणाऱ्या सोमनाथ शिंदे (Somnath Shinde) याच्याविरूध्द मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड पोलिस ठाण्याचे (Daund Police Station) अंमलदार बापू रोटे यांनी याबाबत माहिती दिली. शहरातील राज्य राखीव पोलिस दल (SRPF) गट क्रमांक सातमध्ये सशस्त्र पोलिस नाईक या पदावर कार्यरत असणारे सोमनाथ गंगाराम शिंदे (वय ३३, रा. ५६५ क्वॅार्टर्स, एसआरपीएफ वसाहत, दौंड) यांचे त्यांच्या पत्नीशी २५ जून रोजी सकाळी वाद झाला होता.

Daund Police Station Case
बेळगाव: एक महिन्याच्या बाळाच्या अपहरणामुळे डॉक्टरचं बिंग फुटलं; चौकशीत उघड झालं गर्भपाताचं रॅकेट

पत्नीच्या पाठीत, मांडीवर बेदम मारहाण

पत्नी प्रियांका शिंदे यांनी घरासाठी किराणा सामान आणले असता, सोमनाथ शिंदे यांनी `मला न विचारता किराणा सामान का भरले?` असा प्रश्न करीत शिवीगाळ करून हाताने व बेल्टने डोक्यावर मारहाण केली. त्यावर प्रियांका शिंदे यांनी `तुमचे घरात लक्ष नसते म्हणून मी किराणा भरले, तुम्ही घरात लक्ष देत जावा` असे सांगताच सोमनाथ यांनी रागाच्या भरात त्यांच्या कमरेच्या चामडी पट्ट्याने प्रियांका यांना पाठीत व मांडीवर बेदम मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Daund Police Station Case
Nagpur Crime : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात वार करत पतीकडून हत्या; एका मित्रासोबत पत्नीला पाहिलं अन्..

दौंड पोलिसांनी प्रियांका शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमनाथ शिंदे याच्याविरूध्द भारतीय दंड विधान कलम ३२३ (इच्छापूर्वक दुखापत करणे), ३२४ (घातक साधनांनी दुखापत करणे), ५०४ ( शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे) व ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.