Politics : भाजपपाठोपाठ शिंदे गटाचाही पवारांना धक्का; अनेक नेत्यांचा मविआला 'रामराम'

Eknath Shinde And Vijay Shivtare
Eknath Shinde And Vijay Shivtare
Updated on

मुंबई - भारतीय जनता पक्षाने अजिंक्य राहिलेल्या बारामती लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यासाठी भाजपचे केंद्रातील मंत्री बारामती दौऱ्यावर आले होते. भाजप पाठोपाठ आता शिंदे गट देखील बारामती मतदार संघाला सुरुंग लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. (Sharad Pawar news in Marathi)

Eknath Shinde And Vijay Shivtare
Jayant Patil: 'पहाटेची शपथविधी ही पवारांची खेळी'; जयंत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ

पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूरसह सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

माजी आमदार नारायण आबा पाटील, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष महारुद्र पाटील, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वसंतराव अरडे, वरवंटे बुद्रुकचे माजी सरपंच नामदेव बनकर, देविदास भोंग, वैभव जामदार, दौंड मधील धनगर समाजाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव पांडुरंग मेरगळ, विजय मदनेंसह आदींनी शिंदे गटात प्रवेश केला.

Eknath Shinde And Vijay Shivtare
Crime News : प्रजासत्ताक दिनी धक्कादायक घटना! हेड कॉन्स्टेबलने पोलीस स्टेशनमध्येच झाडली स्वत:वर गोळी

आगामी काळातील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसला हा धक्का मानला जात आहे. शिवाय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील मतभेद सर्वश्रूत आहे. अजित पवार यांनी ठरवून शिवतारे यांना पराभूत केल्याची चर्चा होती. आता शिवतारे बारामतीचा पाडाव करून बदला घेणार अशी चर्चाही सुरू झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()