पौड - आमच्या वेळेला पक्षाच्या नेत्यांबाबत मनातून निष्ठा होती. ते जे सांगत होते ती आमच्यासारखी मंडळी पाळत होती. आता मात्र कसली आलीय निष्ठा आणि नाते. आता फक्त कपडेच भारी आहेत. राजकारणाचा नुसता चिखल झालाय..त्यामुळे मतदान करायचीच इच्छा होत नाही, हे उद्गार आहेत भूगाव (ता. मुळशी) येथील १०९ वर्षीय रामचंद्र नामदेव इंगवले यांचे. स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावलेल्या इंगवले यांनी बदललेल्या निवडणुकीबाबत आपली व्यथा व्यक्त केली..रामचंद्र इंगवले यांचा मुलगा कैलास आणि नातू राहुल या तीन पिढ्यांनी एकाचवेळी आज मतदानाचा हक्क बजावला. रामचंद्र इंगवले यावेळी म्हणाले, ‘सुरुवातीला आम्हाला मतदानासाठी लवळे येथे केंद्र होते. महात्मा गांधींचे चरखा केंद्र त्यावेळी भूगावला होते. त्यामुळे महात्मा गांधी, इंदिरा गांधी भूगावला आल्या होत्या..महात्मा गांधी एकदा आमच्या घरी जेवायलाही आले होते. पुण्यात डेक्कनच्या पुलावर परदेशी कपड्यांची होळी केल्याच्या आंदोलनात मीदेखील सहभागी झालो होतो. एनडीएमध्ये कामाला होतो, त्यावेळी पंडित नेहरूंना एनडीएला भेट दिली. त्यावेळी त्यांना सलामी देण्याची मला संधी मिळाली. त्यावेळी पक्षातील ज्येष्ठांना खूप महत्त्व होते..नेते जे बोलतील तो कार्यकर्त्यांसाठी एक आदेश असायचा. कार्यकर्ते प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करायचे. पण आता कसलं काय. नेत्यांचीच आपल्या पक्षावर निष्ठा राहीली नाही. राजकारणात नात्यांचीही पुरी वाट लागली. त्यामुळे सध्या राजकारण आणि पक्ष म्हणजे नुसता चिखल झालाय..स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत झालेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा या निवडणुकांत मी न चुकता मतदानाचा हक्क बजावला, परंतु राजकारणातील या चिखलामुळे आता मतदान करायची इच्छा होत नाही. अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.