Pune : वैकुंठ स्मशानभूमीतील प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजनांबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून समाधान व्यक्त

स्मशानभूमीत अद्ययावत यंत्रणेचा वापर केल्याने प्रदूषण कमी होण्यास मदत
pollution control corporation expressed its satisfaction regarding measures taken reduce pollution in vaikunth crematorium pune
pollution control corporation expressed its satisfaction regarding measures taken reduce pollution in vaikunth crematorium puneSakal
Updated on

पुणे : वैकुंठ स्मशानभूमीतील प्रदूषणाचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले होते. नागरिक, सामाजिक संस्थांचा दबावानंतर महापालिका प्रशासनाने वैकुंठ स्मशानभूमीमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणेसह (एसपीसी) विविध प्रकारच्या उपाययोजना राबविल्या. आता तेथील प्रदूषण कमी होऊ लागले असून त्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळानेही समाधान व्यक्त केले आहे.

शहराच्या वेगवेगळ्या भागात मृत्यू झालेल्या नागरिकांवर वैकुंठ स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार करण्यावर कुटुंबीय, नातेवाइकांचा भर असतो. त्यानुसार, वैकुंठ स्मशानभूमी येथे शव दहनासाठी गॅस दाहिनी, विद्युत दाहिनी व लाकडांचा वापर केला जातो. त्यातून बाहेर पडणाऱ्या धुलीकणांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

या पार्श्‍वभूमीवर, वैकुंठ स्मशानभूमीतील प्रदूषणावर नियंत्रण आणावे, यासाठी स्थानिक नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान वैकुंठ स्मशानभूमीस शहराच्या वेगवेगळ्या भागातील स्मशानभूमीच्या सद्यःस्थितीची पाहणी एका संस्थेने केली होती. त्यांनी तेथील दुरवस्था, प्रदूषण व सोई सुविधांचा अभावाबाबतचा अहवाल त्यांनी महापालिकेस दिला होता.

खासदार ऍड.वंदना चव्हाण यांनीही यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून उपाययोजना करण्यास सांगितले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने प्रदूषण कमी करण्यासाठी पावले उचलण्यास सुरवात केली होती. महापालिकेने केलेल्या संबंधित कामांची पाहणी प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडूनही वेळोवेळी करण्यात येत होती.

दरम्यान, यासंदर्भात राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सहसंचालक विद्यानंद मोटघरे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल आणि तक्रारदार नागरिकांची नुकतीच ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीमध्ये मोटघरे यांनी पालिकेने प्रदूषण कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले.

"वैकुंठ स्मशानभूमीसह अन्य स्मशानभूमीमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात आल्या. या कामाची दखल प्रदूषण नियंत्रण महामंडळाने घेऊन त्याबाबत समाधान व्यक्त केले आहे. वैकुंठ स्मशानभूमी येथे ६० ते७०टक्के अंत्यसंस्कार विद्यूत दाहिनीमध्ये होत आहेत. तेथे आणखी चार विद्युत दाहिनी बसविण्यात येणार आहेत. ''

- श्रीनिवास कंदुल, प्रमुख, विद्युत विभाग. महापालिका.

प्रदूषण कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजना

- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार चिमण्या उभारणे

- स्मशानभूमीमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा (एपीसी) बसविणे

- अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर होणाऱ्या शेडमध्येही अद्ययावत यंत्रणेचा वापर

- गॅस दाहिनी, विद्युत दाहिनीचा वापर वाढविण्यावर भर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.