खड्ड्यांमुळे मुळा रस्त्याची दुरवस्था

वाहनचालक त्रस्त; पालिकेकडून दुरुस्तीकडे दुर्लक्ष
mula road
mula road sakal
Updated on

खडकी : महापालिका हद्दीतील मुळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. मेट्रोच्या कामामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील एकेरी वाहतूक खडकी कँटोन्मेंट हद्दीतून वळविण्यात आली आहे. परिणामी मुळा रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. वाहनांच्या वाढत्या वाहतुकीमुळे या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तसेच पावसामुळेही येथे खड्डे पडले असून, त्यामध्ये पाणी साचत आहे. त्याचा त्रास वाहनचालकांना होत असून, त्यांना वाहने चालवताना कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे मुळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पाच वड चौकात वाहतूक पोलिस आहेत; मात्र खड्ड्यामुळे वाहने संथगतीने जातात व परिणामी सगळ्यांना कोंडीला सामोरे जावे लागत आहे. तसेच परिसरातील पादचाऱ्यांनाही या खड्ड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणातील वाहतुकीमुळे रहिवाशांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन जावे लागते.

mula road
विज्ञान प्रसार’ चित्रपट महोत्सवात पुणे विद्यापीठाची बाजी

दरम्यान, गेल्या दोन वर्षांपूर्वी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा या रस्त्याची दुरवस्था झाली असून, महापालिकेच्या पथ विभागाने या समस्येकडे पुन्हा लक्ष देऊन हे खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी वाहनचालक व परिसरातील नागरिक करत आहेत. एकेरी वाहतूक केल्याने या रस्त्यावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या भागात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे आम्हाला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडवा लागतो. त्यात आता पावसाचे पाणी साचल्याने पाण्यातून वाहन गेल्यास रस्त्यावरून पायी चालणाऱ्यांवर ते पाणी उडते. संबंधित विभागाने या समस्येकडे लक्ष देऊन रस्ता लवकरात लवकर दुरुस्त केला पाहिजे.

mula road
‘मोठे भाऊ’ भारतीयांना धोका कमी!

"रस्त्यावर खड्डे आणि त्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. या खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघातही घडले आहेत. मात्र महापालिकेकडून रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही." - टिंकू दास, रहिवासी, मुळा रस्ता

"पाऊस थांबल्यावर या रस्त्याची डागडुजी केली जाईल, तसेच जसजसे डांबर मिळेल, तसे रस्त्याचे काम केले जाईल."- सुरेखा ताजणे, पथ विभाग, महापालिका पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.