पुणे - पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाला प्रौढ समजून त्यावर खटला चालविण्यासाठी पोलिसांनी बाल न्याय मंडळात (जेबीबी) अर्ज दाखल केलेला आहे. तर अपघातातील कार परत मिळावी आणि मुलाचा पासपोर्ट परत मिळण्यासाठी अग्रवाल कुटुंबीयांनी जेजेबी अर्ज केला आहे. या तीनही अर्जांवर आता २६ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.