पुणे - ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे या तिघांविरुद्ध फौजदारी खटला चालविण्यास राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. .कल्याणीनगर परिसरात १९ मे रोजी मध्यरात्री पोर्शे मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीदरम्यान, विशाल अग्रवाल आणि त्याची पत्नी शिवानी यांनी मुलाला वाचविण्यासाठी ससूनमधील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. तावरे, डॉ. हाळनोर यांना पैसे दिले. पोलिस तपासात अग्रवालच्या मुलासह दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा प्रकार समोर आला होता..डॉ. तावरे, डॉ. हाळनोर आणि घटकांबळे सरकारी कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालविण्यास परवानगी मिळावी, यासाठी पुणे पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम १९७ नुसार राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. राज्य सरकारने आरोपींविरुद्ध फौजदारी खटला चालविण्यास मंजुरी दिली..वैद्यकीय शिक्षण विभागाचे हे पत्र विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी गुरुवारी दाखल केले. त्यामुळे आरोपी विशाल अग्रवाल, त्याची पत्नी शिवानी, ससूनमधील डॉक्टरांसह सात आरोपींविरुद्ध आरोप निश्चित झाल्यानंतर सुनावणी सुरू होणार आहे, असे विशेष सरकारी वकील हिरे यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.