पुणे - पबमध्ये मद्यपान करून सुसाट पोर्श कार चालवत दोघा आयटी अभियंत्यांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याचा अहवाल बाल न्याय मंडळात (जेजेबी) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी काही जबाब नोंदविण्यात आले असून, त्यानुसार पुरवणी अहवाल दाखल करण्यात येणार आहे. इतर गुन्ह्यांचा तपास पूर्ण होत आला असून, लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
कल्याणीनगरमधील पोर्श कार अपघाताच्या घटनेला शुक्रवारी (ता. १९) दोन महिने पूर्ण होत आहे. या गुन्ह्यात अल्पवयीन मुलाला आणि चालकाच्या अपहरण प्रकरणात त्याच्या आजोबाला जामीन मिळाला आहे, तर रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणात मुलाचे आई-वडील, ससूनमधील डॉक्टर व कर्मचारी तसेच नमुने बदलण्यात मदत करणारे दोन आरोपी अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.
मुलाला प्रौढ घोषित करणार का?
मुलाला प्रौढ घोषित करण्यासाठी ६० ते ९० दिवसांची प्रक्रिया आहे. त्यानंतर मुलाला प्रौढ ठरविण्याबाबत निर्णय होतो. कोणत्याही अल्पवयीन मुलाला प्रौढ घोषित करायचे असेल तर तसा अर्ज पोलिसांनी मंडळात दाखल करणे गरजेचे आहे. या अर्जाचा विचार करत त्यावर निर्णय घेण्यासाठी मंडळ एक समिती स्थापन करते.
बाल न्याय (काळजी आणि संरक्षण) कायद्याच्या कलम १५ मध्ये असे नमूद केले आहे, की १६-१८ वयोगटातील कोणतेही मूल एखाद्या हेनस ऑफेन्सच्या (जघन्य अपराध) बाबतीत फौजदारी न्यायालयात हस्तांतरित केले जाऊ शकते, ज्याची व्याख्या त्याच कायद्याच्या कलम २(३३) मध्ये आहे.
१४ - एकूण आरोपी
0७ - जामीन मिळालेले
अल्पवयीन मुलगा
सुरेंद्रकुमार अग्रवाल (आजोबा)
नमन भुतडा (कोझी पबचे मालक)
सचिन काटकर (कोझीचे व्यवस्थापक)
संदीप सांगळे (ब्लॅक पबचे मालक)
नीतेश शेवानी (ब्लॅक पबचा कर्मचारी)
जयेश गावकर (ब्लॅकच्या बार काउंटरचा व्यवस्थापक)
येरवडा कारागृहात असलेले ०७
विशाल अग्रवाल (मुलाचे वडील)
शिवानी अग्रवाल (आई)
डॉ. अजय तावरे (ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख)
डॉ. श्रीहरी हाळनोर (आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी)
अतुल घटकांबळे (शिपाई)
अश्पाक मकानदार व अमर गायकवाड (आर्थिक व्यवहार करणारे)
अल्पवयीन मुलाला आणि त्यांच्या आजोबांना जामीन झालेला आहे, तर विशाल आणि शिवानी अग्रवाल यांच्या जामीन अर्जाची सुनावणी सुरू आहे. अपघातानंतर दाखल झालेल्या काही गुन्ह्यांत विशाल अग्रवाल यांना जामीन मंजूर झालेला आहे. सध्या ते रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. गुन्ह्याचा तपास अद्याप सुरू आहे.
- ॲड. प्रशांत पाटील, अग्रवाल कुटुंबीयांचे वकील
गुन्ह्याचा तपास पूर्ण होत आला असून, लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यात येत आहे. जे मुद्दे तपासणे बाकी आहे त्यांची आरोपींकडे चौकशी करण्यात येत आहे. मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात काही नवीन जबाब नोंदविले असून, पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येत आहे. गुन्ह्यात कलमवाढही केली आहे. मुलाला प्रौढ घोषित करत फौजदारी खटला चालविण्यासाठी बाल न्याय मंडळात अर्ज केला आहे.
- गणेश इंगळे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा-१ व तपास अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.