Porsche Car Accident Case : अरुणकुमार सिंगच्या कर्मचाऱ्याने पाठवले आशिष मित्तलला पैसे

रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अखेर अरुणकुमार देवनाथ सिंग शरण आला.
porsche car accident pune
porsche car accident punesakal
Updated on

पुणे - कल्याणीनगर अपघात प्रकरणात ‘पोर्श’ कारमध्ये मागे बसलेल्या अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयात शरण आलेला आरोपी अरुणकुमार सिंग याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने आशिष मित्तल याला पैसे दिले होते, असे तपासातून पुढे आले आहे. तर रक्ताचे नमून बदलण्यासाठी विशाल व शिवानी अग्रवाल यांनी साक्षदारांच्या मार्फत दिलेल्या चार पैकी एक लाख रुपये हस्तगत करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.