पुणे - कल्याणीनगर भागातील पोर्श मोटार अपघातप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांविरुद्ध शुक्रवारी (ता. १५) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या गुन्ह्यात १७ साक्षीदार तपासून २४२ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे..आदित्य अविनाश सूद (वय ५२, रा. सोपानबाग, घोरपडी) आणि आशिष सतीश मित्तल (वय ३७, रा. बेलवेडर सोसायटी, विमाननगर, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.पोर्श मोटार अपघातात संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मोटारचालकाच्या दोन अल्पवयीन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्यात सक्रिय सहभाग असल्याने या आरोपींचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे हे दोघे येरवडा कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहेत..मोटारचालक मुलाच्या दोन अल्पवयीन मित्रांना वाचविण्यासाठी सूद आणि मित्तलने ससूनच्या तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर व न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांना लाच दिली. त्यानंतर सूदने एका मुलाच्या रक्ताच्या नमुन्याच्या जागी स्वतःच्या रक्ताचा नमुना दिला. तसेच, मित्तलने आरोपी अरुणकुमार सिंग याच्या सांगण्यावरून दुसऱ्या मुलाच्या जागी स्वतःचे रक्त दिल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे..त्यांनतर अटकेच्या भीतीने दोघे आरोपी परराज्यात पळून गेले होते. पोलिसांची पथके मागावर असल्याचे कळताच आरोपी पुण्यात परतले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना १९ ऑगस्ट रोजी अटक केली होती. आरोपींविरुद्ध सबळ पुरावे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे शिवाजीनगर येथील विशेष व जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.