पुणे - पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाला प्रौढ समजून त्यावर खटला चालविण्यासाठी आवश्यक असलेली तयारी पोलिसांनी केली आहे. मुलाला प्रौढ ठरविण्याबाबत पोलिसांनी बाल न्याय मंडळात (जेबीबी) अर्ज दाखल केलेला आहे. त्यावर २८ ऑगस्टला निकाल होण्याची शक्यता आहे.