पुणे : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यातील रुग्णसंख्या आता आटोक्यात आली आहे. कमी होणाऱ्या रुग्णसंख्येमुळे पुण्यातील वीकेंड लॉकडाऊन प्रशासनाने रद्द केला आहे. दरम्यान, गेल्या पाच आठवड्यात पॉझिटीव्हीटी रेट 19 टक्क्यांवरून 8 टक्के इतका खाली आला. 22 एप्रिल ते 28 एप्रिल या कालावधीत 28 हजार 13 रुग्ण सापडले होते. त्यानंतर 29 एप्रिल ते 5 मे या आठवड्यात 25 हजार रुग्ण आढळले होते. गेल्या आठवड्यात 10 हजार तर 20 मे ते 26 मे या कालावधीत 5 हजार 369 नवे रुग्ण सापडले. आठवड्याला एकूण होणाऱ्या चाचण्यांच्या तुलनेत नव्या रुग्णांमध्ये झालेली घट ही दिलासादायक अशी आहे.(Positivity rate declined in Pune 573 new patients in one day)
जिल्ह्यातील शुक्रवारची कोरोना रुग्ण आकडेवारी
- पुणे शहर --- ५७३
- पिंपरी चिंचवड --- ५२०
- जिल्हा परिषद कार्यक्षेत्र --- ११८२
- नगरपालिका क्षेत्र --- २३०
- कॅंटोन्मेंट बोर्ड --- १९
------------------------
- पुणे जिल्हा एकूण --- २५२४
- आजचे एकूण कोरोनामुक्त --- ३१६१
- आजचे मृत्यू --- ६०
पुण्यातील वीकेंड लॉकडाऊन रद्द
कोरोनाबाधितांची संख्या घटू लागल्याने महापालिकेने टप्प्याटप्प्याने अनलॉकच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. शनिवारपासून आता आठवड्याच्या सातही दिवस अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह काही ठराविक दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेस सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारी असलेले वीकेंड लॉकडाउन रद्द करण्यात आला आहे.
आठवडाभर काय राहणार सुरु? (वेळी सकाळी ७ ते ११)
- किराणा, भाजीपाला, फळ विक्री दुकाने, डेअरी, मिठाई, चिकन, मटन, अंडी, मासे विक्री आणि सर्व प्रकाराची खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने
- कृषी संबधित बी, बियाणे, खते, उपकरणे, त्यांच्याशी निगडीत देखभाल दुरुस्ती सेवा ही दुकाने
- पाळीव प्राणी खाद्यांची दुकाने
- पावसाळा हंगामाकरिता नागरिक अथवा संस्थांसाठी साहित्याची निर्मिती करणारी दुकाने
- चष्म्याची दुकाने
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.