Pune News : तीन महिन्यांत सदनिकेचा ताबा द्यावा; ग्राहक आयोगाचा महिलेला दिलासा

आयोगाचे अध्यक्ष जयंत देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे आणि अनिल जवळेकर यांनी हा निकाल दिला.
Possession of flat should given within three months Consumer Commission pune crime police
Possession of flat should given within three months Consumer Commission pune crime policeesakal
Updated on

पुणे : बुक केलेल्या सदनिकेचा वेळेत ताबा न मिळाल्याने ग्राहक आयोगात तक्रार दाखल करणाऱ्याला महिलेला येथील अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिलासा दिला आहे.

Possession of flat should given within three months Consumer Commission pune crime police
Pune Market News : लसूण, गवार, टोमॅटोच्या भावांत वीस टक्क्यांनी वाढ

आयोगाचा आदेश झाल्यापासून तीन महिन्यांत तक्रारदार महिलेला सदनिकेचा ताबा द्यावा. मुदतीत ताबा न दिल्यास विकसकाने दरमहा पाच हजार रुपये तक्रारदार महिलेला द्यावे, असा निकाल आयोगाने दिला आहे.

आयोगाचे अध्यक्ष जयंत देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे आणि अनिल जवळेकर यांनी हा निकाल दिला. याबाबत मोशीमधील गंधर्वनगरीत राहत असलेल्या वैशाली संतोष शेळके यांनी ध्रुवराज बिल्डर्सचे भागीदार धनेश मारुती थोरात आणि अजित ज्ञानेश्‍वर पवार यांच्याविरोधात आयोगात तक्रार दाखल केली होती.

Possession of flat should given within three months Consumer Commission pune crime police
Mumbai-Pune Expressway : मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दुपारी 'या' वेळेत दोन तास बंद

विकसकांकडून मोशीत एक गृहप्रकल्प विकसित करण्यात येत होता. त्यात तक्रारदार यांनी १९ लाख एक हजार ७६० रुपये किमतीची एक सदनिका खरेदी केली होती. त्याबदल्यात त्यांनी विकसकांना १६ लाख ९८ हजार रुपये रोख स्वरूपात दिले होते.

ऑक्टोबर २०१८ मध्ये सदनिकेचा ताबा दिला जार्इल, असे त्यावेळी विकसकांनी स्पष्ट केले. मात्र जुलै २०२२ पर्यंत सदनिकेचा ताबा न मिळाल्याने तक्रारदार यांनी आयोगात धाव घेतली. या प्रकरणात विकसक हजर न झाल्याने आयोगाने एकतर्फी आदेश दिला.

Possession of flat should given within three months Consumer Commission pune crime police
Mumbai-Pune Expressway : मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दुपारी 'या' वेळेत दोन तास बंद

विकसकाने तक्रारदार यांना २५ हजार रुपये नुकसान भरपार्इ, पाच हजार रुपये तक्रार खर्च आणि निकालाच्या तारखेपासून तीन महिन्यांत सदनिकेचा प्रत्यक्ष, खुला आणि कायदेशीर ताबा द्यावे, असा आदेश आयोगाने दिला आहे. तीन महिन्यांत ताबा न दिल्यास पुढील प्रत्येक महिन्याला विकसकाला तक्रारदार यांना पाच हजार रुपये द्यावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.