सुरक्षा कवचासाठी डाक सेवकांची डॉ. अमोल कोल्हेंकडे धाव

ग्रामीण डाक सेवकांना ५० लाख रुपयांचे विमा कवच मिळण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा; ग्रामीण डाक सेवक संघटनेची मागणी.
Dr Amol Kolhe and Post Worker
Dr Amol Kolhe and Post WorkerSakal
Updated on

मंचर - कोरोनाच्या (Corona) महाभयंकर संकटात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या ग्रामीण डाक सेवकांना (Post Employee) (पोस्टाचे खाते बाह्य कर्मचारी) ५० लाख रुपयांचे विमा (Insurance) कवच मिळावे. या मागणीसाठी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांनी केंद्र सरकारकडे (Central Government) पाठपुरावा करावा.' अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना पुणे ग्रामीणचे अध्यक्ष महेंद्र राऊत व सचिव एकनाथ मंडलिक यांनी ईमेलद्वारे केली आहे. (Postal Workers for safety shield Run to Amol Kolhe)

राऊत म्हणाले 'ग्रामीण डाकसेवक हे गेल्या तीस ते ४० वर्षापासून ग्रामीण भागात पोस्टमन म्हणून उन्हाळा, पावसाळा व थंडीतही घरोघरी जाऊन महत्वाची कागदपत्रे देण्याचे काम करत आहेत. पण अजून पोस्ट खात्याने डाकसेवकांचा पोस्ट खात्यात समावेश केलेला नाही. कार्यालयात बसून काम करणार्यांचा सन्मानपूर्वक पोस्ट खात्यात समावेश केला आहे. आम्हाला सावत्रपनाची वागणूक दिली जात आहे. कोविड महामारीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पण जीव धोक्यात घालून ग्रामीण डाकसेवक दारोदारी फिरून पत्र, रजिस्टर, मनीऑर्डर, मेडिसिन पार्सल वाटप करत आहेत. त्यातूनच डाक सेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.'

Dr Amol Kolhe and Post Worker
कोरोनानंतरच्या बुरशीसाठी हवी ‘टास्क फोर्स’; म्युकरमायकॉसीसच्या रूग्णसंख्येत वाढ

'पुणे जिल्यात एकूण ७५० ग्रामीण डाक सेवक आहेत. राज्यात कोरोनामुळे २५ ते ३० डाक कर्मचार्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात पाच डाक सेवकांचा समावेश असून दोन जण शिरूर लोकसभा मतदार संघातील आहेत. त्यांची कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.'

- एकनाथ मंडलिक, सचिव ग्रामीण डाक सेवक संघटना पुणे ग्रामीण विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.