अजबच! चक्क झाडाला लागले बटाटे, पाहण्यासाठी होतेय गर्दी; पाहा Video

potato has grown above the ground surface in nirgudsar ambegaon taluka watch video
potato has grown above the ground surface in nirgudsar ambegaon taluka watch video
Updated on

निरगुडसर (जि. पुणे) : बटाटा झाडाला लगडला आहे असं म्हटलं तर तुमच्या यावर विश्वास बसणार नाही. परंतु हे खरं आहे. निरगुडसर ता. आंबेगाव येथील शेतकरी संदीप व धनेश पांडुरंग वळसे पाटील यांच्या शेतात चक्क एका झाडाला लहान मोठे १७ ते १८ बटाटे लागल्याची घटना घडलीय. दरम्यान झाडाला लागलेले बटाटे हा कुतूहलाचा विषय बनला आहे.

आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, बटाटे जमिनीत निघतात हे सर्वांना माहीत आहे परंतु बटाटे जर झाडाच्या फांदीलाच जर एका झाडाला चक्क बटाटे झाडाला फळा प्रमाणे लगडलेले निघाले तर आश्चर्याची बाब आहे.

निरगुडसर ता.आंबेगाव येथील शेतकरी संदीप व धनेश पांडुरंग वळसे पाटील यांची निरगुडसर जवळच असलेल्या गण्या डोंगराच्या जवळ साडेतीन एकर क्षेत्र जमीन आहे. त्यामध्ये त्यांनी बटाटा लागवड केली आहे. सध्या पीक काढणीला असल्याने पिकाचा पाला कापणी सुरू असताना एका झाडाला चक्क बटाटे आढळून आले आहेत.

हेही वाचा - आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

potato has grown above the ground surface in nirgudsar ambegaon taluka watch video
MPSC Result News : STI परीक्षेची निकाल जाहीर, 'इथे' पाहा अंतिम गुणवत्ता यादी

झाडाच्या फांद्यांना लहान मोठे असे चक्क १७ ते १८ बटाटे मिळून आले. जमिनीत येणाऱ्या बटाट्या प्रमाणेच हे बटाटे असून थंडीमुळे जरा हिरवे पडले आहेत. झाडाला बटाटे आढळून आल्याने परिसरात कुतूहलाचा विषय बनला आहे. हे बटाटे पाहण्यासाठी शेतकरी, नागरिक गर्दी करत आहेत.

potato has grown above the ground surface in nirgudsar ambegaon taluka watch video
CM शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांशी; अजित पवार म्हणाले, "यांच्यात चढाओढच लागलीय…"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.