Baner News : बाणेर बालेवाडी परिसरात विजेचा लपंडाव; नागरिक उकाड्याने हैराण

दोन आठवड्यांपूर्वी सलग तेरा तास वीजपुरवठा खंडित
power outage in Baner Balewadi area heat wave msedcl mseb pune
power outage in Baner Balewadi area heat wave msedcl mseb puneSakal
Updated on

बालेवाडी : बाणेर बालेवाडी परिसरात सतत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरीकांना उकाडा ,गरमी , आणि डासांचा उपद्रव सहन करावा लागत आहे .सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने घरातून काम करणारे नोकरदार ,गृहिणींची घर कामे विद्यार्थ्यांचा अभ्यास या सगळ्याछा गोष्टींवर परिणाम होत आहे.

तरी प्रश्न लवकरच सोडवण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहेत. बाणेर येथील पॅन कार्ड क्लब रस्ता येथील समर्थ कॉलनी या भागा मध्ये( ता.१० मे )रोजी सहा तास वीजपुरवठा खंडित झाला होता, तर यापूर्वी दोन आठवड्यांपूर्वी सलग तेरा तास वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे उकाड्याने आणि डासांच्या उपद्रवामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

अशीच परिस्थिती बालेवाडीतही आहे . याभागात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरू आहे हे काम करत असताना ,किंवा इतर बांधकामाच्या ठिकाणी, एम एन जी एल कडून खोदकाम करताना महावितरणकडून टाकण्यात आलेल्या केबल तुटतात, नादुरूस्त होतात. या भागात अनेक महाविद्यालये असल्याने अनेक परगावचे विद्यार्थी या भागामध्ये राहतात.

मे महिन्यातच या मुलांच्या परीक्षा असल्याने रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यास त्याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होतो. त्यामुळे महावितरण कडून लवकरात लवकर उपाययोजना करून खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.

बाणेर येथील पॅनकार्ड क्लब रोड समर्थ कॉलनी येथे सतत वीजपुरवठा खंडित होत असतो. आम्ही स्मार्ट सिटी राहतो की, आदिवासी भागात राहतो हेच समजत नाही . या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली नाही तर आमच्या कॉलनीतील नागरिक महावितरणाच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचा विचार करत आहेत .

- पांडुरंग भुजबळ, समर्थ कॉलनी रहिवाशी

मी बालेवाडी परिसरामध्ये राहते माझी परीक्षा आत्ता सुरू आहे आणि सतत वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे याचा परिणाम अभ्यासावरही होतो . तरी महावितरणने योग्य त्या उपाय योजना कराव्यात.

- नंदिनी पाटील, महाविद्यालयीन विद्यार्थी

आमच्या कॉलनीत वीजपुरवठा खंडीत झाल्या नंतर , केबल जळाली असल्याचे लक्षात आल्यानंतर महावितरण कडून भुमिगत केबलचे काम करण्यासाठी दोन लोक टिकाव घेऊन खोदकाम करत होते, रात्रीचे अकरा वाजले , तरी खोदकाम होईना. मग आम्ही सगळ्यानी खोदायला मदत केली, व हे काम करून घेतले. आपण कोणत्या शतकात राहतो, आणि महावितरण कामासाठी काय सामुग्री वापरतात हे पाहून आश्चर्य वाटले.

- जतीन रानपूरा समर्थ कॉलनी, बाणेर.

तापलेल्या उन्हानंतर वादळ व मुसळधार पावसाचा वीज यंत्रणेवर मोठा परिणाम होतो. प्रामुख्याने ओव्हरहेड लाईनवर. तसेच भूमिगत केबल नादुरुस्त होण्यासाठी विविध स्थानिक संस्थेकडून होणारे खोदकाम कारणीभूत आहे. खोदकामांत केबल डॅमेज होतात पण वीज खंडित होत नाही. मात्र पावसात डॅमेज झालेले केबल नादुरुस्त होतात.

- निशिकांत राऊत,उपमुख्य जनसंपर्क अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.