पुण्यात शनिवारी या भागात वीज पुरवठा होणार खंडीत

ढोले पाटील रोड परिसरातील वीज बंद राहणार
Electricity cut off in lasalgaon
Electricity cut off in lasalgaonesakal
Updated on

पुणे : महावितरणच्या बंडगार्डन विभाग अंतर्गत नायडू उपकेंद्रातील 10 एमव्हीए क्षमतेचे अजस्त्र पॉवर ट्रॉन्सफॉर्मर बदलण्याचे पूर्वनियोजित काम करण्यात येणार असल्याने शनिवारी (दि. 12) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बोट क्लब रोड, वाडिया कॉलेज, ढोले पाटील रोड, ताडिवाला रोड, बंडगार्डन रोड आदी परिसरातील सुमारे 8 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. (Power supply at Boat Club Road, Tadiwala Road, Dhole Patil Road will be cut off in Pune on Saturday)

महावितरणच्या नायडू उपकेंद्रातील 10 एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रॉन्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यामुळे तो बदलणे अत्यावश्यक झाले आहे.

Electricity cut off in lasalgaon
पुणे शहरात 187 तर जिल्ह्यात 826 नवे रुग्ण

नवीन पॉवर ट्रॉन्सफॉर्मर उपलब्ध झाला असून तो बसविण्याचे काम शनिवारी (दि. 12) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी या उपकेंद्रातील सहा पैकी पाच 22/11 केव्ही उच्चदाब वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर नायडू हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटलचा वीजपुरवठा सुरु ठेवण्यासाठी उर्वरित एका उच्चदाब वाहिनीचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु ठेवण्यात येणार आहे. सध्या वर्क फ्रॉम होमसह संचारबंदीनंतर आयटी कंपन्या, खासगी व सरकारी कार्यालये सुरु झाल्यामुळे तसेच ऑनलाईन परीक्षा सुरु असल्यामुळे गुरुवारऐवजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी शनिवारी पॉवर ट्रॉन्सफॉर्मर बदलण्याचे काम करण्यात येत आहे.

Electricity cut off in lasalgaon
पुण्यात 40 टक्के लस दुसऱ्या डोससाठी राखीव

नायडू उपकेंद्रांतील पूर्वनियोजित कामामुळे सुमारे 8 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा शनिवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत बंद राहणार आहे. यासंदर्भात महावितरणकडे नोंदणीकृत असलेल्या मोबाईलधारक संबंधीत वीजग्राहकांना ‘एमएसएम’द्वारे पूर्वमाहिती देण्यात येत आहे. बंडगार्डन रोड, बोट क्लब रोड, राजगुरु चौक, भाजी मार्केट, ताडिवाला रोड, नारंगी बाग रोड, बोट क्लब सोसायटी, कपिला टॉवर, ढोले पाटील रोड, टाटा मॅनेजमेंट एरिया, अतूर पार्क, नायर रोड, मंगलदास रोड, वाडिया कॉलेज रोड, नठाण रोड, सिटी पॉईंट, सिटी टॉवर, माणिकचंद ऑयकॉन एरिया, साई राधे कॉम्प्लेक्स, आरबीएम मिल आदी परिसरासह सेवेज प्लांटचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे अशी विनंती महावितरणकडून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.