केवळ ८ टक्केच निधी खर्च

Home
Home
Updated on

पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात अभियांत्रिकी विभागाशी संबंधित भांडवली विकासकामांवर आठ महिन्यांत तरतुदीच्या तुलनेत केवळ आठ टक्के म्हणजे २६ कोटी ६६ लाख खर्च झाला आहे. सुधारित अंदाजानुसार मार्चअखेर २० टक्के खर्च होऊ शकणार आहे. प्राधिकरणाच्या गृहप्रकल्पांतील विविध अडथळ्यांमुळे अपेक्षित खर्च होऊ शकला नसल्याचे प्राधिकरण प्रशासनाचे म्हणणे आहे. 

प्राधिकरणाच्या अभियांत्रिकी विभागातर्फे भांडवली विकास कामांसाठी २०१८-१९ या वर्षासाठी ३३१ कोटी ७५ लाखांची मूळ तरतूद होती. तुलनेत एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान २६ कोटी ६६ लाख खर्च झाला. तर, डिसेंबर ते मार्च दरम्यान आणखी ३९ कोटी ८५ लाख खर्च अपेक्षित आहे.

खर्च कमी होण्याची प्रमुख कारणे
  गृहप्रकल्पांसाठी पर्यावरण विभागाची परवानगी मिळण्यास विलंब
  अग्निशमन, सांडपाणी, पाणीपुरवठा ना हरकत दाखल्यांसाठी लागलेला वेळ
  स्पाइन रस्त्याचे त्रिवेणीनगर येथील जागेचा ताबा न मिळाल्याने काम रखडले
  साई चौक (जगताप डेअरी) येथील उड्डाण पुलाचे काम अपूर्ण

प्राधिकरणाच्या विविध गृहप्रकल्पांसाठी आवश्‍यक पर्यावरण विभागाची परवानगी मिळण्यास विलंब लागला. त्याशिवाय, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शुल्काच्या मुद्याबाबत अडचणी होत्या. त्यामुळे विविध गृहप्रकल्पांवर अपेक्षित खर्च होऊ शकला नाही. पेठ क्रमांक १२ आणि सहामधील गृहप्रकल्पाचे काम, पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या कामाला आता गती मिळणार आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात ३५० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च होऊ शकेल.
- सतीशकुमार खडके, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.