Prakash Ambedkar : अनुसूचित जाती-जमातीच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण संविधानिक व्हावे; प्रकाश आंबेडकर

राज्यात नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे (ओबीसी) आरक्षण कायमस्वरूपी स्थगित करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा डाव आहे. त्यातून शरद पवार यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे २२५ आमदार निवडून आणणार असल्याचे वक्तव्य केले आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkarsakal
Updated on

पुणे : राज्यात नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे (ओबीसी) आरक्षण कायमस्वरूपी स्थगित करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा डाव आहे. त्यातून शरद पवार यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे २२५ आमदार निवडून आणणार असल्याचे वक्तव्य केले आहे. पवार यांचे हे वक्तव्य अत्यंत घातक आहे. त्यामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण संविधानिक झाले पाहिजे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी (ता.२५) पुणे येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केले.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरक्षण बचाव यात्रा सुरु करण्यात आली आहे. या यात्रेची सुरुवात मुंबईतील चैत्यभूमी येथून करण्यात आली. आज ही यात्रा पुण्यात दाखल झाली. यावेळी ॲड. आंबेडकर यांनी समता भूमीवर जाऊन महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, प्रियदर्शी तेलंग,अविनाश भोसीकर, पुणे शहर अध्यक्ष मुन्वर कुरेशी, सरचिटणीस ॲड अरविंद तायडे, ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲड. आंबेडकर पुढे म्हणाले, ‘‘ओबीसींच्या आरक्षणासंदर्भातील परिस्थिती सांगणे गरजेचे आहे. यासाठी आता निर्णायक वेळ आहे. आपण घटनेने मिळालेल्या अधिकारांसोबत आहात की, नेत्यांच्या आणि संघटनेच्या सोबत आहे, हे सांगणे गरजेचे आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेत ओबीसींचे किमान १०० आमदार निवडून आणणे गरजेचे आहे. यासाठी आपण कोणत्याही पक्षात असाल, तर तिथे ओबीसींना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले पाहिजेत.’’

‘... तर तोपर्यंत कोणावरही विश्‍वास ठेवू नका’

दरम्यान, सध्याच्या स्थितीत राज्यातील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे तीनही मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत. याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप हे अनुक्रमे ब्राह्मण व कायस्थ यांचे प्रतिनिधी आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, ही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मागणी कायदेशीर नाही, असे जोपर्यंत कोणी म्हणत नाही. तोपर्यंत कोणावरही विश्वास ठेवू नका, असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com