पुणे : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या अचानक छातीत दुखू लागल्यानं त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या ठिकाणी त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. पुढील काही दिवस त्यांना रुग्णालयात राहावं लागणार आहे. पण आता त्यांची प्रकृती कशी आहे? याची माहिती त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.