Prakash Ambedkar : मी कोर्टाला शिव्या घातल्या नसत्या तर भुजबळ बाहेर आले नसते ;प्रकाश आंबेडकर

मराठा अशा दंगली होऊ शकतात अशा स्थानिक पोलिसांना सूचना आहेत
prakash ambedkar
prakash ambedkar esakal
Updated on

कँटोन्मेंट : महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलताना म्हणाले की पॅलेस्टाईन इस्त्रायल युद्धाचा परिणाम भारतालाही भोगावे लागणार आहेत. 8 डिसेंबर ला मुंबईत आझाद मैदानात शांती सभा घेण्यात येणार आहे. मुस्लिम संघटना आणि आम्ही त्या सभेला उपस्थित राहणार आहोत.

prakash ambedkar
Share Market Tips: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये ?

आंतरराष्ट्रीय प्रश्नांकडे धार्मिक चष्म्यातून बघता कामा नये. माझी पण भुजबळ विषयी नाराजी नाही. त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यात मीच आहे. मी कोर्टाला शिव्या घातल्या नसत्या ते बाहेर आले नसते. भुजबळ यांनी आम्हाला सोबत यावं असं म्हटलं असेल तरी आम्हाला त्याची गरज नाही. ओबीसी आरक्षणाचा जनक मी आहे 6 डिसेंबर नंतर हिंदू मुस्लिम किंवा ओबीसी विरुद्ध मराठा अशा दंगली होऊ शकतात अशा स्थानिक पोलिसांना सूचना आहेत.

पुढे ते म्हणाले की, महात्मा फुलेंना त्यांच्या काळात मोठा त्रास देण्यात आला जे धार्मिक स्वातंत्र्यसाठी लढले त्यांना देशभक्त ठरवण्यात आलं. जे सामाजिक स्वातंत्र्यसाठी लढले त्यांना ब्रिटिशांचे हस्तक ठरवण्यात आलं, आज तीच परिस्थिती आहे. आम्ही संविधान बदलणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. आर एस एस प्रमुख डॉ मोहन भागवत यांनी ते म्हणावं तरच आम्ही मान्य करू .6 डिसेंबर नंतर देशात काहीही होऊ शकतं दंगलीची शक्यता आहे ज्यांचा ओबीसी लढ्याशी संबंध नाही ते दंगली कशा होतील अशी वक्तव्य करत आहेत. उद्या सरकार कुणाचे असेल माहीत नाही पण नरेंद्र मोदी पंतप्रधान असणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.