Prataprao Pawar : प्रतापराव पवार यांना ‘ग्लोबल प्राइड’ सन्मान,लंडनमधील महाराष्ट्र मंडळाकडून गौरव

Prataprao Pawar : प्रतापराव पवार यांना उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी लंडनमधील महाराष्ट्र मंडळाकडून ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ सन्मान जाहीर झाला असुन हा सन्मान ८ नोव्हेंबर २०२४ रोजी ब्रिटिश संसदेच्या ‘हाउस ऑफ कॉमन्स’मध्ये प्रदान केला जाणार आहे.
prataprao pawar receives global pride award
Prataprao Pawar sakal
Updated on

पुणे : लंडनमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या महाराष्ट्र मंडळाकडून देण्यात येणारा ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ हा सन्मान ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना आज जाहीर करण्यात आला.

उद्योग क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल प्रतापराव पवार यांचा या सन्मानाने गौरव करण्यात येणार आहे. ‘‘प्रतापराव पवार यांच्या उद्योगक्षेत्रातील कार्य कर्तृत्वाने कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये नवे मानदंड प्रस्थापित करतानाच अगणित मराठीजनांना प्रेरणा दिली आहे,’’ असे महाराष्ट्र मंडळाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. हा सन्मान वितरण सोहळा येत्या ८ नोव्हेंबर २०२४ रोजी ब्रिटिश संसदेच्या ‘हाउस ऑफ कॉमन्स’मध्ये (प्रतिनिधी गृह) दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे.

परदेशस्थ मराठी बांधवांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र मंडळाची १९३२ मध्ये न. चिं. केळकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने स्थापना करण्यात आली होती. तब्बल ९२ वर्षांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या संस्थेने विविध माध्यमांतून जगभर मराठी संस्कृतीचा प्रचार अन् प्रसार करताना कला, उद्योग आणि क्रीडा आदी क्षेत्रांमध्ये मराठी माणसाला काम करता यावे म्हणून त्याच्यामागे मोठे पाठबळ उभे करण्याचे काम केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.