Pune Crime : अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केलेल्या पोलिसाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केलेल्या पोलिसांचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला. न्यायाधीश एस.पी पोंक्षे यांनी हा आदेश दिला. अत्याचार झालेल्या मुलीने बाळाला जन्म दिला आहे.
Pre-arrest bail rejected for cop who married minor girl and got her pregnant
Pre-arrest bail rejected for cop who married minor girl and got her pregnantSakal
Updated on

Pune Crime : अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केलेल्या पोलिसांचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला. न्यायाधीश एस.पी पोंक्षे यांनी हा आदेश दिला. अत्याचार झालेल्या मुलीने बाळाला जन्म दिला आहे.

गणेश शिवाजी चिमटे ( वय ३३) असे अटकपूर्व जामीन फेटाळलेल्या पोलिसाचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गणेश चिमटेसह शिवाजी शेषराव चिमटे, कुंता शिवाजी चिमटे व सारिका सचिन थोरात यांच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अत्याचार झालेली मुलगी १६ वर्षांची आहे. मुलगी अल्पवयीन आहे याची माहिती असूनही शिवाजी व कुंता चिमटे यांनी तिचे आरोपी आरोपी पोलिसाशी लग्न लावून दिले. पोलिसांनी तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केले. त्यातून तिने अपत्य जन्माला घातले. पोलिसाने या गुन्ह्यात अटकपूर्व जामिन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता.

त्याला सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला. आरोपी हा पोलिस खात्यात असूनही त्याने गुन्हा केलेला आहे. तो कर्तव्यावर विनापरवानगी गैरहजर आहे. खात्याअंतर्गत चौकशीलाही सामोरे जाण्यास टाळाटाळ करीत आहे. त्याने मुलीशी गुपचूपपणे बालविवाह करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत, असा युक्तिवाद ॲड. अगरवाल यांनी केला. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने पोलिसाचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.