पुणे : बांधकाम क्षेत्रात परवडणारे घरे निर्माण करणाऱ्या बाजारपेठेत गुंतवणूक करण्यास परदेशी कंपन्यांची असलेली पसंती वाढतच आहेत. या क्षेत्रामध्ये २०११ पासून दोन हजार ५९७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची प्रायव्हेट इक्विटी (पीई) गुंतवणूक झाली, तर सरकारने या विभागाला दिलेल्या चालनेमुळे खासगी फंड्सना ०.६२ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स गुंतवणूक करण्याची संधी निर्माण होणार आहे.
बांधकाम क्षेत्रातील सल्लागार कंपनी असलेल्या ‘नाइट फ्रँक’ने आपला नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात हे मुद्दे मांडले आहेत. २०११ पासून देशात परवडणाऱ्या गृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणूक निवासी विभागातील एकूण पीई गुंतवणुकीच्या १७ टक्के राहिली आहे.
जागतिक स्तरावर ३२५ दशलक्ष घरांची मागणी आहे. ज्यात भारताचा हिस्सा ११ टक्के आहे. २०३० पर्यंत देशातील ४० टक्क्यांहून अधिक लोक शहरी भागामध्ये राहू शकतात. त्यामुळे परवडणाऱ्या सदनिकांच्या मागणीत येत्या काळात मोठी वाढ होईल. त्यामुळे प्रायव्हेट इक्विटी कंपन्यांसाठी प्रचंड गुंतवणुकीची संधी निर्माण होतील, असे अहवालात नमूद केले आहे.
प्रायव्हेट इक्विटी म्हणजे काय?
फक्त भांडवल किंवा मालकीचे समभाग जे सार्वजनिकपणे व्यवहार केले जात नाहीत किंवा स्टॉकच्या विपरीत सूचीबद्ध नाहीत. हे फंड सामान्यतः अधिग्रहण, व्यवसायाच्या विस्तारामध्ये किंवा एखाद्या फर्मच्या बळकटीसाठी वापरले जातात.
प्रधानमंत्री आवास योजनेविषयी
केंद्र सरकारचे ११.२२ दशलक्ष घरांची मागणी पूर्ण करण्याचे लक्ष
३१ मार्च २०२१ पर्यंत ११.३ दशलक्ष घरांना ही योजना मान्य
आजपर्यंत ४.८ दशलक्ष घरांना सबसिडी
परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांना अर्थसाहाय्य करण्यासाठी काही मोठे गुंतवणूकदार सध्या बाजारात आहेत. या गुंतवणुकीचा लक्षणीय भाग मध्यम-उत्पन्न असलेल्या विभागासाठी आहे.
"गृहनिर्माणाचा तुटवडा असलेल्या ईडब्ल्यूएस व एलआयजी विभागांमधील बांधकामामध्ये गुंतवणूक खूपच कमी प्रमाणात होत आहे."
- गुलाम झिया, वरिष्ठ कार्यकारी संचालक, पायाभूत सुविधा व मूल्यांकन विभाग, नाइट फ्रँक इंडिया
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.