कोरोनापासून मुलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी

कोरोनापासून मुलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी
Updated on

पुणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्याससोबत आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि मुलांसह पालकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात येईल. तसेच, मुलांमधील ॲंटीबॉडीज तपासण्यासाठी ‘सीरो सर्वे’करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

कोरोनाबाधित लहान मुलांना वेळेत औषधोपचार मिळावेत, यासाठी टास्क फोर्स समिती गठित करण्यात आली आहे. विभागीय उपायुक्त संतोष पाटील, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, पुणे महापालिका उपायुक्त रुबल अग्रवाल, टास्क फोर्सच्या अध्यक्ष डॉ. आरती किणीकर, तसेच समितीचे पदाधिकारी डॉ. प्रदीप आवटे, डॉ. संजय नातू, डॉ. आनंद पंडित यांच्यासह इतर बालरोग तज्ज्ञांनी सोमवारी पत्रकारांशी ऑनलाइन संवाद साधला.

कोरोनापासून मुलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी
नाशिक-पुणे रेल्वे : बाधित शेतकऱ्यांना मिळणार ५ पट मोबदला?

कोरोना उपाययोजनांबाबत महापालिकेकडून पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. जिजामाता रुग्णालय, वाय.सी.एम. आणि डी.वाय. पाटीलसह इतर रुग्णालयांतील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यात येत आहे. जिल्ह्यात उत्पादक कंपनीपासून रुग्णालयापर्यंत ऑक्सिजनच्या वाहतुकीतील वेळ कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात रुग्णालयाच्या परिसरातच ४८७ ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहेत. ससून रुग्णालय, मगर हॉस्पिटल, सोनवणे कोविड मॅटर्निटीसह इतर कोविड सेंटरमध्ये मुलांसाठी राखीव बेड ठेवण्यात येणार आहेत. लहान मुलांवरील उपचारासाठी डॉक्टर्स नियुक्त करण्यात येत आहेत. पुण्यात ४७८ कोरोना बाधित लहान मुलांपैकी ९ मुलांना ऑक्सिजन बेडसची गरज भासली. ६८ मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, इतर मुले घरी विलगीकरणात आहेत, असे या वेळी सांगण्यात आले. केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बालरुग्णांचे निदान, चाचण्या आणि उपचारपद्धती अवलंबिण्यात येईल. झोपडपट्ट्यांतील मुलांचे नियमित लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्याची गरज आहे, अशा सूचना तज्ज्ञांकडून करण्यात आल्या.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुले, पालक आणि शिक्षकांना प्रशिक्षण वाफ घेताना मुले भाजण्याचे प्रकार, याबाबत खबरदारी घेण्याची गरज. औषधे घेण्यापूर्वी बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.अतिजोखमीचे आजार असलेल्या मुलांनी वेळेवर औषधे घ्यावीत. आनुवंशिक आजार, लठ्ठपणा असलेल्या मुलांनी प्रतिकारशक्ती चांगली ठेवावी. मूकबधिर मुलांना संभाषणात अडचण येऊ नये, यासाठी वेगळे मास्क पालकांनी सहा महिन्यांपासून पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे लसीकरण वेळेवर करावे

कोरोनापासून मुलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी
पुणे-सोलापूर महामार्ग परिसरातील अपघातात महिलेचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.