पुणे - शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश रघुवीर गोवेकर यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. गुन्हेगारांवर दबदबा असलेल्या गोवेकर यांनी त्यांच्या सेवा कालावधीत अतिशय क्लिष्ट आणि संवेदनशील गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळविले आहे.