Rohit Pawar : पंतप्रधान मोदी व भाजपने स्वार्थी राजकारणासाठी खोटा इतिहास पसरवू नये

आमदार रोहित पवार यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर निशाणा साधला.
rohit pawar narendra modi
rohit pawar narendra modisakal
Updated on

पुणे - 'काँग्रेसने बंजारा समाजाचा गुन्हेगारीचा शिक्का पुसला, वसंतराव नाईक यांच्यासारखा मुख्यमंत्री दिला, असे असताना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोहरादेवीच्या धार्मिक कार्यक्रमात बंजारा समाजासाठी काँग्रेसने काहीच केले नाही, अशी खोटी माहिती दिली. आपल्या स्वार्थी राजकारणासाठी पंतप्रधान मोदी व भाजपने खोटा इतिहास पसरवू नये,' अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी केली.

पवार यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर निशाणा साधला. यावेळी बंजारा समाजाचे हिरालाल राठोड, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू ययाती नाईक, डॉ. शाम जाधव, भोजराज चव्हाण आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, 'पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील दोन कोटी बंजारा समाज नाराज झाला आहे. तत्कालीन पंतप्रधान नेहरू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भटक्या विमुक्त समाजाच्या माथ्यावर असणारा गुन्हेगारीचा शिक्का पुसला आहे. त्यामुळे मोदी यांनी समाजाला भ्रमित करण्याचे काम करू नये"

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची झालेली बैठक व हरियाणा, जम्मू काश्मिर येथील निवडणुकीच्या निकालाबाबत पवार म्हणाले, 'विदर्भातील काही मतदार संघातील इच्छुकांनी पवार यांची आज भेट घेतली. पवार यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. इच्छुकांचे काय म्हणणे आहे, तेथील राजकीय समीकरण काय आहे, याची माहिती घेण्यात आली आहे.

अनेकांना आमच्या पक्षात येण्याची इच्छा आहे. मात्र सर्वांना घेऊन फायदा नाही, निष्ठावंतांना न्याय देण्याची त्यांची भूमिका आहे.' हरियाणा, जम्मू काश्मीर येथील निवडणुकीचा उद्या निकाल आहे, या राज्यात भाजपला यश मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

रोहित पवार म्हणाले,

- एखाद्याला जवळ करून संपवायचे हेच भाजपचे कारस्थान

- हर्षवर्धन पाटील यांनाही तसेच केले, आता अजित पवार यांचेही भाजप तेच करत आहे

- तिसरी आघाडी ही केवळ मत विभागणी करेल. भाजपच्याच फायद्याचे काम ते करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.