शिक्षणमंत्री म्हणतात, परीक्षा रद्द; अन् हे मुख्याध्यापक म्हणतात, परीक्षा घेणारच!

Principles insist to take exams canceled by Education Minister
Principles insist to take exams canceled by Education Minister
Updated on

पुणे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शालेय शिक्षणमंत्र्यांनी नववी आणि अकरावीची परीक्षा रद्द केली असताना नारायणगावमधील एका शाळेत ही परीक्षा घ्यायचीच, असा हट्ट तेथील मुख्याध्यापकांनी धरला आहे. विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेबाबत फोनवरून सूचना देण्याचा आदेशही त्यांनी शिक्षकांना दिला आहे.


बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
नारायणगाव येथे गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर ही शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र वाघोले यांना नववी आणि अकरावीची परीक्षा घ्यायचीच आहे. विद्यार्थी शाळेत शिकण्यासाठी येत असेल, तर त्याची परीक्षा झाली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार त्यांनी आज सर्व शिक्षकांना व्हॉट्सअॅपवरून मेसेज पाठविला आहे. विशेष म्हणजे शिक्षणमंत्र्यांनी कालच या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे, तरीही वाघोले परीक्षा घेण्याबाबत ठाम आहेत.

दहावीचा भूगोलाचा पेपर अखेर रद्द; नववी, अकरावीचा निर्णय वाचा! 
शिक्षकांना पाठविलेल्या मेसेजमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "सबनीस विद्यामंदीरमधील नववीच्या आणि अकरावीच्या सर्व वर्गशिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना आणि पालकांना फोन करून सांगावे, की इयत्ता नववीची व इयत्ता अकरावीची वार्षिक परीक्षा शाळा सुरू होईल, त्यावेळी घेण्यात येईल. आपल्या वर्गातील कोणताही विद्यार्थी या सूचनेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. एखाद्या विद्यार्थ्याचा फोन लागत नसेल, तर त्याच्या मित्राला निरोप देण्यास सांगावे. यासंबंधीचा अहवाल दोन दिवसांत माझ्याकडे आपला वर्ग, इयत्ता व विद्यार्थी संख्येसहित आपल्या स्वाक्षरीने सकाळी अकरा ते बारा या वेळात द्यावा. वरील सूचनेची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी."
मुख्याध्यापकांनी आज अचानक पाठविलेल्या या मेसेजमुळे शिक्षकही चिंतेत आहेत. शिक्षणमंत्र्याचा आदेश मानायची की मुख्याध्यापकांचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. याबाबत वाघोले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले, "शाळा सुरू झाल्यानंतर परीक्षा घेण्यात कोणतीच अडचण नाही. मुलांना अभ्यास करायला चांगला वेळही आहे. त्यामुळे पालकांना त्यांच्या मुलांना अभ्यास करण्यास सांगावे. शाळा कधी सुरू होतील, हे सांगता येणार नाही. पण शाळा सुरू झाली की परीक्षा होईल."

पिंपरीतील पाॅझिटिव्ह संख्या 35; एकाच दिवशी आढळले सहा रुग्ण
जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला असता ते म्हणाले, "शिक्षणमंत्र्यांनी आदेश दिल्याने नववी आणि अकरावीच्या परीक्षा आता होणार नाहीत, त्या रद्द केल्या आहेत. मात्र, त्या घेण्याचा हट्ट मुख्याध्यापक करीत असतील, तर ते कारवाईस पात्र राहतील."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.