Yerwada Prison Break : असा पळाला येरवडा जेलमधून कैदी, खुल्या कारागृहाचा घेतला होता फायदा..

खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे.
prisoner serving life imprisonment escaped from Yerwada Jail pune crime police
prisoner serving life imprisonment escaped from Yerwada Jail pune crime police Sakal
Updated on

पुणे : खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे येरवडा कारागृहातील सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आली आहे.

आशिष भारत जाधव (रा. मावळ, जि. पुणे) असे कारागृहातून पलायन केलेल्या कैद्याचे नाव आहे. आशिष जाधव याच्याविरुद्ध २००८ मध्ये एकाचा खून केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

कैदी आशिष जाधव (सी-९४९) याला येरवडा खुल्या कारागृहातील बराकी क्रमांक चारमध्ये ठेवले होते. त्याला कारागृहात रेशन विभागात काम दिले होते. सोमवारी दुपारी कैद्यांची मोजणी करताना तो आढळून आला नाही.

त्यावेळी तो पळून गेल्याचे कारागृह प्रशासनाच्या लक्षात आले. या प्रकरणी तुरुंग अधिकारी हेमंत पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशिष जाधवने खुल्या कारागृहाचा घेतला फायदा, शोध घेण्यासाठी पोलिस पथक रवाना सराईत गुन्हेगार आशिष जाधव हा मूळचा मावळ तालुक्यातील असून, तो वडगाव धायरी येथे राहत होता.

मागील १५ वर्षांपासून येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याला मागील काही दिवसांपासून खुल्या कारागृहात रेशन विभागात काम सोपवले होते. खुले कारागृह असल्यामुळे त्याने पोलिसांची नजर चुकवून पळ काढला. त्याचा पोलिस कसून शोध घेत आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक काटे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.