Pune News : येरवडा कारागृहातील कैदी मोबाईलवर साधणार कुटुंबीयांशी संवाद

येरवडा कारागृहात प्रायोगिक तत्त्वावर स्मार्टकार्ड योजनेचा प्रारंभ
Prisoners of Yerawada Jail will communicate with their families on mobile phones pune
Prisoners of Yerawada Jail will communicate with their families on mobile phones punesakal
Updated on

पुणे : कारागृहात कैद्यांकडे मोबाईल सापडल्याच्या बातम्या कानावर पडतात. परंतु आता कारागृह प्रशासनाने येरवडा कारागृहातील कैद्यांसाठी मोबाइलद्वारे कुटुंबीयांशी संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येरवडा कारागृहात प्रायोगिक तत्त्वावर स्मार्टकार्ड योजनेचा प्रारंभ शुक्रवारी (ता. २३) करण्यात आला.

अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह व सुधार सेवा) अमिताभ गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, ॲलन ग्रूपचे योगेंद्र रेड्डी या वेळी उपस्थित होते. कैद्यांना नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी यापूर्वी कारागृहात कॉइनबॉक्स योजना कार्यान्वित होती. परंतु कॉइनबॉक्स सुविधा कालबाह्य झाली आहे. कैद्यांना ठेवण्यात आलेल्या बराकीमध्ये न्यावे लागत होते.

Prisoners of Yerawada Jail will communicate with their families on mobile phones pune
Pune News : खचलेल्या चेंबरमुळे अपघात; भाजपचे प्रशानसाविरोधात आंदोलन

ही बाब कारागृह सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक होती. या पार्श्वभूमीवर कारागृह अधीक्षकांनी कैद्यांना नातेवाइकांशी संवाद साधण्यासाठी साधे मोबाईल उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार अतिरिक्त पोलिस महासंचालक गुप्ता यांनी स्मार्टकार्ड मोबाईल योजनेस मंजुरी दिली आहे.

कैद्यांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड होणार

येरवडा कारागृहात कैद्यांसाठी ४० बूथ लावण्यात आले आहेत. गंभीर गुन्ह्यातील कैद्यांना वगळून ही सुविधा देण्यात येणार आहे. या सुविधेमुळे प्रत्येक कैद्यांना महिन्यातून तीन वेळा दहा मिनिटे त्यांचे वकील आणि नातेवाईकांशी संवाद साधता येईल.

Prisoners of Yerawada Jail will communicate with their families on mobile phones pune
Pune : बारामतीच्या जि. प. शाळेत आढळला दारू ढोसून झिंगलेला गुरुजी! गटशिक्षण अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली

त्यामुळे कारागृहात मारामारीच्या घटना होणार नाहीत. कैद्यांचे मानसिक संतुलनही चांगले राहील. या सुविधेचा गैरवापर होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली आहे. हे सर्व कॉल रेकॉर्ड होणार आहेत. जे कैदी कॉल रेकॉर्ड करण्यास नकार देतील, त्यांना ही सुविधा मिळणार नाही. प्रायोगिक तत्त्वावरील ही योजना यशस्वी ठरल्यास राज्यातील इतर कारागृहांमध्ये राबविण्यात येईल, माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.