पुणे - मिळकतकराची ४० टक्के सवलत देण्यासाठी महापालिकेने सुरु केलेले सर्वेक्षण ८० टक्के पूर्ण झाले असून, ३ लाख ६१ हजार घरापर्यंत कर्मचारी पोचले आहेत. दरम्यान या सर्वेक्षणाचे अवघे दोन दिवस उरले असून, त्यास मुदतवाढ दिली जाणार नाही असे मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.