पुणे - पुणेकरांना मिळकतकरावर १५ मे पासून देण्यात आलेल्या ५ किंवा १० टक्क्यांच्या सवलतीचा आजचा शेवटचा दिवशी होता. गेल्या अडीच महिन्यात पुणेकरांनी १२८३.५८ कोटी रुपये जमा केले आहेत. तर सर्व्हर डाऊन झाल्याने कर भरणा करण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतीत ८० कोटी रुपये कर जमा झाले आहेत.
अशी माहिती मिळकतकर विभागाचे प्रमुख, उपायुक्त अजित देशमुख यांनी दिली आहे.
पुणे महापालिकेतर्फे दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत २५ हजार रुपयांपर्यंतच्या मिळकतकरावर १० टक्के तर त्यापेक्षा जास्त रकमेवर ५ टक्के सवलत दिली जाते. पण यंदाच्या वर्षी मिळकत करावरील ४० टक्के सवलत कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने सुधारित बिले तयार करण्यासाठी वेळ लागला.
त्यामुळे यंदा १५ मे ते ३१ जुलै या कालावधीत ही सवलत देण्यात आली. ३१ जुलै रोजी सवलतीचा शेवटचा दिवस होता, पण अनेक नागरिकांनी एकाच वेळी ऑनलाइन कर भरत असल्याने महापालिकेचे सर्व्हर ठप्प झाले. दिवसभरात कर भरता आला नसल्याने या नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन ही सवलत २ ऑगस्ट रात्री ११.५९ मिनिटापर्यंत वाढवण्यात आली.
१५ मे ते २ ऑगस्ट (रात्री ८पर्यंत) रोजी ७ लाख ५५ हजार नागरिकांनी १२८३ कोटी ५६ लाख रुपयांचा कर भरला आहे. तर सर्व्हर ठप्प झाल्याने दोन दिवस वाढवून दिले. त्याचा फायदा सुमारे ९१ हजार नागरिकांना घेत ८० कोटी रुपयांचा कर भरला आहे. गतवर्षी ६ लाख ९५ हजार मिळकतधारकांनी या सवलतीचा लाभ घेत ११४९ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले होते. यंदा कर भरणाऱ्यांची संख्या गेल्यावर्षीच्या ६० हजाराने वाढली आहे.
शेवटच्या दिवशी १५.२६ कोटी रुपये जमा
मिळकतकरावर सवलत घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस असल्याने आज रात्री ८ पर्यंत १५ कोटी २६ लाख रुपये कर जमा झाला आहे.
१५ मे ते २ ऑगस्ट २०२३
जमा झालेला कर - १२८३ कोटी ५६ लाख
कर भरणा करणारे नागरिक - ७.५५ लाख
१ एप्रिल ते २ जून २०२३
जमा झालेला कर - ११४८ कोटी
कर भरणा करणारे नागरिक - ६.९५ लाख
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.