मिळकतकरात सवलत नाही तर मतही नाही; नोटाने धडा शिकवा

मिळकतकरावरील ४० टक्के सवलत पुन्हा दिली नाही तर नागरिकांनी महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला मतदान करू नये.
Voting
VotingSakal
Updated on
Summary

मिळकतकरावरील ४० टक्के सवलत पुन्हा दिली नाही तर नागरिकांनी महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला मतदान करू नये.

पुणे - मिळकतकरावरील ४० टक्के सवलत पुन्हा दिली नाही तर नागरिकांनी महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला मतदान करू नये. तर नोटाचे बटन दाबून राजकारण्यांना धडा शिकवा असे आवाहन सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलनकर यांनी केले.

'मिळकतकरातील ४० टक्के सवलत टिकवण्यासाठी" नागरीकांनी काय करावे या विषयावर आयोजित सजग नागरिक मंचच्या सभेत विवेक वेलणकर बोलत होते.

ही सवलत रद्द होण्यास पुणे महापालिका आयुक्तांची या संदर्भात शासनाला केलेली शिफारस कशी कारणीभूत आहे. आणि या बाबतीत सर्वच राजकीय पक्ष कसे अपयशी ठरले याचे माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीच्या आधारे सविस्तर विवेचन विवेक वेलणकर यांनी सादर केली. ते म्हणाले, एक कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या ४७५ थकबाकीदारांची १२०० कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे. पण प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरीकांची ५० वर्षे उपलब्ध असलेली ४० टक्के सवलत बिनदिक्कतपणे काढून घेते हे संतापजनक आहे. ही सवलत पुनर्स्थापित करण्यासाठी आता नागरीकांनाच लढा उभारुन राजकीय पक्षांवर दडपण आणावे लागेल.

यासाठी शहरातील जास्तीतजास्त गृहनिर्माण संस्थांनी आपल्या सोसायटीच्या दारावर "मालमत्ता करातील ४० टक्के सवलत पुनर्स्थापित करण्याचा शासन निर्णय महापालिकेच्या निवडणुकांआधी झाला नाही तर या निवडणुकीत आम्ही कोणत्याच राजकीय पक्षाला मत न देता " नोटा" ला मतदान करणार आहोत" असे फ्लेक्स लावावेत असे आवाहन विवेक वेलणकर यांनी केले.

यावेळी बोलताना पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था फेडरेशन चे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी फेडरेशन मार्फत हा विषय मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांचेकडे लावून धरण्याचा व वेळप्रसंगी न्यायालयाचा मार्ग स्विकारण्याचा इरादा व्यक्त केला. जुगल राठी यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()