Pune : मिळकत कर आकारणी विरुद्ध समाविष्ट गावातील नागरिक त्रस्त, महापालिकेला टाळे ठोकून करणार आंदोलन

महापालिकेत समाविष्ट होऊन कित्येक वर्ष उलटल्यानंतरही 34 गावांना कुठल्याही सोई सुविधा मिळालेल्या नाहीत.
PMC
Pune Municipal Corporationsakal
Updated on

पुणे : महापालिकेत समाविष्ट होऊन कित्येक वर्ष उलटल्यानंतरही 34 गावांना कुठल्याही सोई सुविधा मिळालेल्या नाहीत. याऊलट समाविष्ट गावांकडून अन्यायकारक पद्धतीने मिळकतकर आकारला जात आहे, असा आरोप समाविष्ट गावातील सर्वपक्षीय हवेली तालुका कृती समितीची नुकतीच बैठक पार पाडली. या बैठकीत अन्यायकारक मिळकतकर आकारणीविरुद्ध महापालिकेस शुक्रवारी, २६ सप्टेंबरला टाळे ठोकून आंदोलन करण्याचा ठराव करण्यात आला.

समाविष्ट 32 गावांच्या हवेली तालुका कृती समितीच्या बैठकीमध्ये कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खडकवासला अध्यक्ष काका चव्हाण, राजाभाऊ रायकर, विलास मते, अशोक मते,पोपटराव खेडेकर, संदीप पोकळे पाटील, सुरेखा दमिस्टे, बापूसाहेब पोकळे, भाऊसाहेब पोकळे, अतुल धावडे पाटील यांच्यासह ३२ गावातील मिळकतदारांसह सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

चव्हाण पाटील म्हणाले, ""अन्यायकारक, अव्यावहारिक मिळकत कर आकारणीमुळे मालमत्ता विकण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. मिळकत धारकांकडुन जुलमी स्वरूपाचा कर आकारला जात आहे. शासन दरबारी अनेकदा याबाबत व्यथा मांडूनही शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी ग्रामपंचायतीच्या फक्त दुप्पट कर आकारण्यात यावा, असे पत्र ग्रामस्थांना दिले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.