Property Tax : मिळकत कर वसुलीसाठी मोठ्यांना सोडून छोट्यांना त्रास

पुणे महापालिकेने मिळकतकराची वसुली वाढविण्यासाठी निवासी जागेतील व्यावसायिक वापराला तीन पट कर लावण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal
Updated on

पुणे - पुणे महापालिकेने मिळकतकराची वसुली वाढविण्यासाठी निवासी जागेतील व्यावसायिक वापराला तीन पट कर लावण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. यासाठी नागरिकांनी त्यांच्या शेजारी सुरू असणाऱ्या व्यावसायिक वापराची तक्रार करावी यासाठी वॉट्सॲप क्रमांक दिला आहे.

मात्र, आता यामुळे शहरात निवासी जागेत मोठे हॉटेल, कार्यालये, बिअरबार वर्षानुवर्षे सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष करत असताना आता घरात छोटेमोठे व्यवसाय करणाऱ्यांनाच लक्ष केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे महापालिकेची ही मोहीम वादात सापडण्याची शक्यता आहे.

दरम्यान नागरिकांनी तक्रार करावी यासाठी 8308059999 या वॉट्सॲप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. कर संकलन विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने अस्तित्वात आलेल्या निवासी, बिगर निवासी, मोकळ्या जागांच्या वापरात बदल केल्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी नुसार कर आकारणी करावी लागते. पुणे शहरामध्ये निवासी मिळकतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत हॉटेल व्यवसाय सुरु आहेत.

निवासी मिळकतीमध्ये बांधकाम विभागाची परवानगी न घेता वापरात बदल करून अनधिकृत हॉटेल, रेस्टॉरंट, बार, खानावळ व्यवसाय आहेत. रात्री उशिरापर्यंत अशा ठिकाणी गोंधळ सुरु असल्याने नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे महापालिकेने अशा मिळकतींवर कारवाई करून तीन पट कर लावण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिकेने अशा मिळकती शोधण्यासाठी व्यावसायीक वीज मिटरची माहावितरणकडून घेतली आहे. तसेच मिळकतकर निरीक्षकांच्या माध्यमातून मिळकती शोधल्या जात आहेत. पण यामध्ये राजकीय वरदहस्त असलेल्यांवर कारवाई करण्याचे टाळले जात आहे. असे असताना आता महापालिकेने घरगुती व्यवसाय करणाऱ्यांनाच टार्गेट केले जात असल्याचे समोर आले आहे.

निवासी मिळकती मध्ये बिगर निवासी व्यवसाय करू असल्यास त्याची तक्रार करण्यासाठी वॉर रूम तयार करण्यात आली आहे. गृह निर्माण संकुलामध्ये निवासी सदनिके व्यतिरिक्त कार्यालयीन वापर, व्यावसायिक वापर उदा. कार्यालय, ब्युटीपार्लर, क्लिनिक, हॉटेल यासह इतर व्यवसाय सुर असल्यास अशा मिळकतींची माहिती 8308059999 या क्रमांकावर कळविता येणार आहे.

त्यासोबत मिळकतींचा पत्ता व लोकेशनही या क्रमांकावर पाठवता येईल. पण या प्रकारामुळे खोडसाळपणाने किंवा त्रास देण्यासाठी तक्रारी होण्याचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे. त्यातून वादही निर्माण होऊ शकतात, अशी भीती काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

‘महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी निवासी मिळकतीमध्ये व्यावसायिक वापर वाढविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी वॉट्सॲप क्रमांकावर तक्रार केल्यानंतर त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. त्यामुळे वाद होणार नाहीत.’

- अजित देशमुख, उपायुक्त, मिळकतकर विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.