भीमानदीच्या तीरावर जलहवाई वाहतूकीसाठी बंदराचा प्रस्ताव

उजनी जलसंपदा, पर्यावरण विभाग तसेच एअरकंट्रोल विभागाची यास मान्यता मिळाल्यानंतर याचे काम होणार आहे.
bhima nadi
bhima nadisakal
Updated on

इंदापूर : उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील इंदापूर तालुक्यातील कालठण या गावी भीमानदीच्या तीरावर जलहवाई वाहतूकीसाठी छोटे बंदर उभारणीसाठीचा प्रस्ताव नागरी हवाई मंत्रालयात पाठविण्यात आला आहे. उजनी जलसंपदा, पर्यावरण विभाग तसेच एअरकंट्रोलविभागाची यास मान्यता मिळाल्यानंतर याचे कामहोणार आहे. यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळेयांनी पाठपुरावा केला आहे. इंदापूर तालुक्यातील कालठण नंबर १ व २ या गावातीललोकांना या सर्व्हेची माहिती नाही मात्र कालठण १ च्या वतीने कर्मयोगी कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव तर २ च्या वतीने ऍड भारत जगताप यांनी या प्रकल्पाचे स्वागत केले आहे. (Pune News)

इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी उजनी जलाशय ते खडकवासला जलाशय अशी जल हवाई वाहतूक सुरू करावी ही बातमी दै. सकाळ ने दि.२ नोव्हेंबर २०२० रोजी प्रसिध्द केली होती. त्याची दखलघेवून खासदार सौ.सुळे यांनी केवडियातेअहमदाबाद सी प्लेन ( जलहवाई वाहतूक) च्या धर्तीवर उजनी ते खडकवासला जल हवाई वाहतूक सुरू करता येईल का याची पाहणीकरण्याच्या सूचना पुणे जिल्हा परिषदेस दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी कुंभारगावभिगवण,कांदलगाव व कालठण ही ठिकाणे निश्चित केली होती.

bhima nadi
राणे विरुद्ध शिवसेना; रमेश मोरेची हत्या का झाली?

कुंभारगाव भिगवण येथे देशी परदेशी पक्षी येत असल्याने तसेच कांदलगाव धरणा जवळ असल्याने ही दोन्ही गावे रद्द झाली. कालठण येथे पाणी पातळी खोल रहात असल्याने येथून जलहवाई वाहतूक करणे हे सोपे जात असल्याने या गावचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास तालुक्याच्या अर्थ कारणास निश्चित चालना मिळणारआहे.कारण राष्ट्रीय महामार्गाने पुणे येथे जाण्यास अडीच ते तीन तास लागतात मात्र जलहवाईवाहतुकीस फक्त अर्धा तास वेळ लागणार आहे.

तालुक्यातील वालचंद उद्योग समूह, सोनाई व नेचर दूध संघ, सहकारी व खाजगीसाखर कारखाने, निर्यातक्षम व दर्जेदार शेतीमाल, लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील उत्पादनांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केट मध्ये कमी वेळेत पोहोचवणे सहजशक्य होणार आहे तर परदेशी व देशा तील पर्यटकांना उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील रोहित, चित्रबलाकसह ३५०पक्षी,कळस ते कडबनवाडी परिसरातील चिंकारा हरणे, शहा पिरान टेकडीवरील विविध पक्षांचे सारंग गार, इंदापूर येथील चित्रबलाक, इतरपक्ष्यांचे गोकुळ, निरा भीमा संगमावरील श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर पाहण्यास गर्दी होवून व्यापार उदीम वाढीस मदत होईल.

bhima nadi
तालिबाननं काश्मीर प्रश्नावर पाजळलं ज्ञान; भारताला दिला सल्ला

यासंदर्भात उजनी धरण व्यवस्थापनचेकार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे म्हणाले,पुणे जिल्हा परिषदेने खाजगी तज्ञ लोकांकडून उजनी काठची पाहणी केली आहे. धरण सुरक्षेस प्राधान्य असून त्यानुसार या प्रकल्पास ना हरकत प्रमाणपत्र दिले जाईल. यासंदर्भात अतुल तेरखेडकर म्हणाले, उजनी जलहवाई वाहतुकीची सर्वप्रथम मागणी केली होती. केंद्र सरकार यासाठी सकारात्मक असल्याचे दिसत असून भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी यासाठी तसेच २२ गावांचा बार माही पाणी प्रश्न सोडविण्यासाठी भीमा ते निरा नदी व्याहळी, निमगाव केतकी,वरकुटे खुर्द ते निमसाखर अशी कालव्याव्दारे जोडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

यासंदर्भात महारुद्र पाटील म्हणाले, उजनी पाणलोट मध्ये गंगावळण येथे पर्यटन केंद्र खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर झाले असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. जलहवाई वाहतुकीमुळे यास निश्चित चालना मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.