Pune News : जमीनीच्या अधिनियमात सुधारणा करण्याच्या प्रस्तावास आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता

उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश; राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांना होणार फायदा
land act
land actsakal
Updated on

वालचंदनगर : खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनींचे धारणाधिकार देण्यासाठी जमीनीच्या अधिनियमात सुधारणा करण्याच्या प्रस्तावास आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असून गेल्या अनेक वर्षापासुन रखडलेल्या खंडकरी शेतकऱ्यांच्या भोगवटा वर्ग - २ च्या जमिनींचे भोगवटा वर्ग १ होण्याचा मार्ग माेकळा झाला.

शासानाच्या निर्णयाचा इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी फटाके वाजवून तसेच लाडू वाटप करुन आनंदउत्सव साजरा केला. शासनाने आत्तापर्यंत १९७२, १९७८ व २०१२ मध्ये खंडकरी शेतकऱ्यांना शेतजमीनीचे वाटप केले होते.

मात्र या जमीनी देताना भोगवटा वर्ग - २ असा शेरा आहे. शर्थीच्या जमीनी असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. जमिनी अंतर्गत हस्तांतर, विक्री व सुधारणा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागत होती.

तसेच शर्थीच्या जमिनी असल्यामुळे जमीनीचे मुल्यांकन कमी होवून कमी प्रमाणात कर्ज मिळत होते. इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे गेल्या अनेक वर्षापासुन खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल होते.

त्यांनी चालू वर्षीच्या पावसाळी अधिवेशानामध्ये खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्‍न लक्षवेधीच्या माध्यमातुन मांडून सभागृहाचे लक्ष वेधले होते. तसेच गेल्या महिन्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार मंत्रालयातील उपमुख्यमंत्री यांच्या दालनात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक घेऊन खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले होते.

बैठकीतील चर्चेनुसार सदर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला आज बुधवार (ता.२९) रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जमिनीच्या अधिनियमात सुधारणा करण्याचा मंत्रिमंडळात निर्णय घेतला असून यामुळे भोगवटा वर्ग - २ जमीनीचे भोगवटा वर्ग - १ रुपांतर होण्याचा मार्ग माेकळा झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या प्रयत्नांतून सकारात्मक निर्णय झाल्याने खंडकरी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींसंदर्भातील प्रश्न निकाली निघाला आहे. या निर्णयाचा इंदापूर तालुक्यातील कळंब गावातील शेतकऱ्यांनी फटाके वाजवून स्वागत केले. तसेच शेतकऱ्यांनी लाडू वाटप केले.

शासनाने निर्णयामुळे खंडकरी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांची प्रगती होणार आहे. या निर्णयासाठी सातत्याने प्रयत्न करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दत्तात्रेय भरणे यांचे इंदापूर तालुक्याच्या वतीने आभार व्यक्त करुन खंडकऱ्यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असल्याचे खंडकरी शेतकरी व ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र डोंबाळे यांनी सांगितले.

यासंदर्भात आमदार दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षापूर्वी प्रश्‍न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्यामुळे मार्गी लागला असून या निर्णयाचा राज्यातील हजारो खंडकरी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.