डिम्ड कन्व्हेयनससाठी पावणे दोनशे सोसायट्यांचे प्रस्ताव 

Proposals of one 100 and 75 Societies for Deemed Conveyance.jpg
Proposals of one 100 and 75 Societies for Deemed Conveyance.jpg
Updated on

पुणे : सहकार विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयनस) विशेष अभियानाला पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या महिन्याभरात १७५ गृहनिर्माण सोसायट्यांनी डीम्ड कन्व्हेयनसचे प्रस्ताव उपनिबंधक कार्यालयात दाखल केले आहेत. या सोसायट्यांची डीम्ड कन्व्हेयनसची प्रक्रिया तीन ते सहा महिन्यांत पूर्ण होईल. 

कन्व्हेयनस केल्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्या सार्वजनिक जागांची मालकी मिळते. बहुतांश बिल्डर स्वत:हून गृहनिर्माण सोसायटीचे अभिहस्तांतरण (कन्व्हेयनस डीड) करून देतात. परंतु काही बिल्डर आणि सभासदांच्या वादात ही प्रक्रिया पूर्ण होत नाही.

ज्या बिल्डरनी स्वत: सोसायटीचे अभिहस्तांतरण करून दिलेले नाही, अशा सोसायट्यांनी डीम्ड कन्व्हेयनस करून घ्यावे, यासाठी सहकार विभागाने विशेष अभियान सुरू केले आहे. या अभियानातंर्गत महिन्याभरात दोन हजार तीनशे सोसायट्यांनी सहभाग घेतला. डिम्ड कन्व्हेयनसबाबत जागृती व्हावी, यासाठी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि सोसायट्यांचे पदाधिकारी एकत्रित कार्यरत आहेत. सध्या ३७१ कर्मचाऱ्यांकडून सोसायट्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. सोसायट्यांनी कन्व्हेयनस केलेले आहे की नाही, तसेच ज्यांनी कन्व्हेयनस केलेले नाही त्यांना त्याचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. 

''गृहनिर्माण सोसायट्यांनी डीम्ड कन्व्हेयनस करून घेण्यासाठी स्वत: पुढे यावे. या अभियानामुळे बिल्डर आणि सभासदांमधील छोटे-मोठे वाद संपुष्टात येत आहेत. काही सोसायट्यांमध्ये सर्वेक्षणासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना अवमानजनक वागणूक मिळते, हे उचित नाही. सर्वेक्षणानंतर किती सोसायट्यांनी कन्व्हेयनस केले आहे, हे स्पष्ट होइल.''
- नारायण आघाव, जिल्हा उपनिबंधक 

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील डिम्ड कन्व्हेयनसची स्क्षिती 

एकूण गृहनिर्माण सोसायट्या १७ हजार ९८४ 
डिम्ड कन्व्हेयनस झालेल्या सोसायट्या २४८२ 
अभियानात एक महिन्यात प्राप्त प्रस्ताव १७५ 
सुनावणी सुरू असलेल्या सोसायट्या १७० 
डिम्ड कन्व्हेयनस लागू नसलेल्या सोसायट्या (खुले प्लॉट, प्राधिकरण, शासकीय जमीन) २१२५ 


अभियानाचा उद्या शेवटचा दिवस 
डीम्ड कन्व्हेयनस अभियानाचा ३१ जानेवारी हा शेवटचा दिवस आहे. परंतु उपनिबंधक कार्यालयात यापुढेही डीम्ड कन्व्हेयनसबाबत प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाच्या वतीने सिंहगड रस्ता परिसरातील सोसायट्यांसाठी पुनर्विकास आणि डीम्ड कन्व्हेयनससाठी रविवारी (ता. ३१) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. परिणय मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता हे चर्चासत्र होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.