Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या महिला विरोधी विधानांचे पडसाद, पुण्यात 'जोडे मारो' आंदोलन

Protest Against Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या या विधानामुळे विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा समाजात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.
Protest Against Sambhaji Bhide In Pune
Protest Against Sambhaji Bhide In PuneEsakal
Updated on

गेल्या दोन दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात महिलांविरोधी विधाने केली होती. ज्यामुळे राज्यभरातील महिलांनी भिडेंच्या विधानांचा निषेध केला होता. या प्रकरणाला दोन-तीन दिवस होऊनही ते शांत होताना दिसत नाही.

आता पुण्यातील महिलांनी भिडे यांनी केलेल्या विधानांचा निषेध करण्यासाठी संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन केले.

यावेळी महिलांनी संतप्त प्रतिक्रिया देत, भिडे भाजपच्या सांगण्यावरून अशी विधना करत महात्त्वाच्या प्रश्नांवरील लक्ष्य हटवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी जर असे प्रकार थांबले नाहीत तर त्यांच्या मिशा कापण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला.

काय म्हणाले होते भिडे?

पुणे येथे बोलताना संभाजी भिडे म्हणाले होते की, "आपल्याला वारकरी-धारकरी संगम हा कार्यक्रम करायचा आहे. त्याचबरोबर गोमाता, भारतमाता, वेदमाता सारख्या 7 मतांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार असणे म्हणजे हिंदवी स्वराज्य व्रत होय. त्यामुळे वटसावित्रीच्या पूजेला अभिनेत्री आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. तेथे फक्त साडी घातलेल्या महिलांनीच जावे."

Protest Against Sambhaji Bhide In Pune
Ajit Pawar : नवाब मलिकांच्या बाबतीत अजित पवार ठाम? प्रश्न विचारताच म्हणाले, तुम्हाला काय त्रास...

याचबरोबर भिडे म्हणाले होते की, "आपल्या जे स्वतंत्र मिळाले ते हांडग आणि दळभद्री स्वतंत्र आहे. हिंदवी स्वराज्य हेच खरे स्वतंत्र आहे."

 संभाजी भिडेंच्या या विधानामुळे विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा समाजात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.

Protest Against Sambhaji Bhide In Pune
Vishwajeet Kadam : पोषण आहारात सापाचे पिल्लू! विश्वजीत कदमांनी सभागृहात मांडला मुद्दा...

संभाजी भीडेंनी गेल्या वर्षी अमरावतीमध्ये महात्मा गांधींबद्दलही वादग्रस्त विधान केले होत. त्यावेळी भीडे म्हणाले होते की, "महात्मा गांधींना मोहनदास करमचंद गांधी म्हणून ओळखले जाते, परंतु करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नव्हते, तर एक मुस्लिम जमीनदार त्यांचे खरे वडील होते." अमरावती येथील सभेत बोलताना भिडे यांनी महात्मा गांधींविरोधात पुरावे असल्याचा दावाही केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()