Pune : वडगाव बुद्रुक हायवे परिसरातील वाहतूक समस्येच्या निषेधार्थ आसूड आंदोलन

रस्त्यावर बेकायदेशीर बांधकामे व कंपाउंड व इतर अतिक्रमणामुळे सुरू
protest against traffic problem Vadgaon Budruk Highway encroachment pune
protest against traffic problem Vadgaon Budruk Highway encroachment punesakal
Updated on

धायरी :  वडगाव बुद्रुक सर्वे सर्वे नं ५४,५६,५७,६२ मधून मुंबई -बंगळूर महामार्ग क्रमांक -४ गेलेला असून, महामार्गाच्या दोन्ही बाजूने  १२ मीटर पुणे महानगरपालिकेचा सेवा रस्ता आहे. सदर सेवा रस्त्याचे काम अर्धवट राहिले असून काही जागामालाकांच्या आडमुठ्या धोरणामुळे नागरिकांना वेठीस धरले जात असून ज्याठिकाणी अतिक्रमण झाले आहे.

त्या ठिकाणी रस्ता बॉटलनेक तयार झाले असून तांसतास नागरिकांना याठिकाणी वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे .तसेच असंख्य अपघातात शेकडो नागरिकांचे प्राण देखील गेले आहे . पुणे मनपा प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असून याच्या निधेधार्थ आज वडगाव बुद्रुक मध्ये नगरसेवक हरिदास चरवड यांच्या नेतृत्वात आसूड आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना नगरसेवक चरवड म्हणाले की, वडगाव बुद्रुक हायवे परिसरात असंख्य शेड्स, बांधकामे झालेली आहे. जवळ जवळ २००० ते ३००० फ्लॅट्स -  कुटुंबे, शाळा, हॉटेल्स या भागात आहे. परंतु सदर भागात सर्व्हिस रस्ता पूर्ण होत नसल्याने असंख्य नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत.

protest against traffic problem Vadgaon Budruk Highway encroachment pune
Pune : बोअरमध्ये पाणी किती? पुणेकरांच्या अनोख्या स्टार्टअप मध्ये बोअरवेलच्या तळाचा ठाव घेणारे संशोधन

सदर रस्त्यावर बेकायदेशीर बांधकामे व कंपाउंड व इतर अतिक्रमणामुळे सुरू करण्यात आलेले सर्व्हिस रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी आणि अपघातांना सामोरे  जावे लागत आहे. तसेच मंजूर निधी देखील परत गेलेला आहे.

तरी सदर अतिक्रमणे त्वरित काढून टाकण्याची कारवाई करावी त्याबत वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही याची दखल घेतली जात नाही. अधिकाऱ्याना प्रत्येक्षही भेटून याबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला परंतु प्रशासनाकडून ना संपर्क , ना प्रयत्न ,  मग हा प्रश्न लोकांचे प्राण जाण्यासाठी सोडून देणार आहात का ?

protest against traffic problem Vadgaon Budruk Highway encroachment pune
Pune : 'स्कीन सिटी चित्रपट रसिक संमेलना’चे उद्‌घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ४ जूनला होणार

याप्रश्नाबाबत स्थानिक पोलीस प्रशासन , वाहतून विभागही खूप आग्रही आहे. प्रयत्न करूनही त्यांना फार मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या पाच वर्षात वेळोवेळी विचारणाकरूनही चर्चा चालू आहे, आम्ही मार्ग काढू असेच उत्तर अधिकाऱ्याकडून मिळालेले आहे.

त्यामुळे नागरिकांना बसणाऱ्या वाहतूक कोंडीच्या फटकाऱ्यासाठी प्रतीकात्मक पोतराजाच्या उपस्थितीत प्रशासनाच्या निधेधार्थ आसूड आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार भीमराव तापकीर यांच्या उपस्थितीत मागण्याचे निवेदन पालिका अधिकाऱ्याना देण्यात आले.

protest against traffic problem Vadgaon Budruk Highway encroachment pune
Pune Crime : पोलिसांनी दोन तास सिने स्टाईलने पाठलाग करून डिझेल चोरांना नागरिकांच्या मदतीने पकडले

 यावेळी अॅड. रामचंद्र कर्डिले, सचिन वांजळे, योगेश दांगट, सारंग नवले , केरबा चरवड, सचिन चरवड, बापूसाहेब पठारे, डॉ.विवेक काळे, सचिन कडू, पंकज फुले , बाळासाहेब बोरकर, सुहास पवार, प्रकाश कोल्हापूरकर मिलिंद हेंद्रे ,

मल्हार येवले, उमेश शिंदे, दिलीप लाले, अनंता बनकर, चंद्रकांत पवळे, भारतभूषण ओझा, सचिन मनेरे, सिद्धेश पाटील, भीमराव चरवड , अण्णासाहेब वाल्हेकर, बाळासाहेब चरवड, मोहन सर,  प्रदीप बक्षी, बाळासाहेब कंगले, बापू ढेबे, मुकुट पासलकर, विलास पाटील, रमेश चरवड, केदारनाना जाधव, स्वप्निल चरवड,

protest against traffic problem Vadgaon Budruk Highway encroachment pune
Pune Accident: पुण्यात ब्रेक फेल झाल्यानं शिवशाही बसचा विचीत्र अपघात

अभिजीत आढाव, अनिकेत चरवड, सिद्धार्थ घोलप, निखिल चरवड , अक्षय चरवड, आकाश लोणारे, महेश निढाळकर, विकास धनवडे, दिग्विजय चरवड, गिरिधर चरवड, विश्वजीत चरवड, श्री पवार. शंकर ढमाले किरण शर्मा निलेश जयस्वाल अशा पाटील राधिका पाटील रामेश्वरी घुले मीना तरळे,

गायत्री कुलकर्णी मंदा गायकवाड संध्या सोनवणे रंजना राऊत जयश्री शिर्के रेणुका पाटील राणी सुतार ज्योत्स्ना पोद्दार अनिल स्वामी कल्पना स्वामी प्रशांत पाटील आरती वाघ रमेश पिसे वृंदा गोगटे अतुल चिंचे प्रकाश कोल्हापुरे संजय वाळके अविनाश पाठक निलेश देशमुख गोपीनाथ शिळीमकर स्वप्नील कोळेकर किशोर काटे आदि मान्यवरांसह हायवे वडगाव बुद्रुक परिसरातील नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()